संकर्षण व्हाया स्पृहा
कार्यक्रम बघायला हवा
कविता गाणी गप्पांचा
आनंद घ्यायला हवा
हास्याचा धबधबा
अखंड वाहीला
टाळ्यांचा कडकडाटाने
कळस गाठला
ओघवती शैली
खुमासदार संवाद
उत्तम सादरीकरणाचा
सुरेल आस्वाद
राधाकृष्णाच्या प्रेमाची
विरहिणी झाली
विठ्ठलाची भजनातून
आळवणी केली
मतदारासोबतच
टकलेपणाचा मान राखला
परभणीच्या बोलीचा किस्सा
भाव खाऊन गेला
एकच विनंती आणि सल्ला
आपलेपणाचा खरा
अंगावर टाकलेल्या हाताचा
उल्लेख टाळलेलाच बरा
भरलेले तुडुंब थिएटर
दिसता डोळे सुखावले
माय मराठीचे चाहते
बघून आनंदाचे भरते आले
सौ वर्षा हेमंत फाटक, पुणे
(परवा यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात हा कार्यक्रम बघितला. उत्तम कार्यक्रमाचे वर्णन कवितेतून करायचा प्रयत्न केला आहे 🙏🏻)
कार्यक्रम बघायला हवा
कविता गाणी गप्पांचा
आनंद घ्यायला हवा
हास्याचा धबधबा
अखंड वाहीला
टाळ्यांचा कडकडाटाने
कळस गाठला
ओघवती शैली
खुमासदार संवाद
उत्तम सादरीकरणाचा
सुरेल आस्वाद
राधाकृष्णाच्या प्रेमाची
विरहिणी झाली
विठ्ठलाची भजनातून
आळवणी केली
मतदारासोबतच
टकलेपणाचा मान राखला
परभणीच्या बोलीचा किस्सा
भाव खाऊन गेला
एकच विनंती आणि सल्ला
आपलेपणाचा खरा
अंगावर टाकलेल्या हाताचा
उल्लेख टाळलेलाच बरा
भरलेले तुडुंब थिएटर
दिसता डोळे सुखावले
माय मराठीचे चाहते
बघून आनंदाचे भरते आले
सौ वर्षा हेमंत फाटक, पुणे
(परवा यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात हा कार्यक्रम बघितला. उत्तम कार्यक्रमाचे वर्णन कवितेतून करायचा प्रयत्न केला आहे 🙏🏻)
- Varsha Hemant Phatak