शोले आणि फक्त शोले !लक्षात राहाणारा चित्रपट.
कलाकार, स्टोरी,संवाद आणि गाणी या चारीही गोष्टी जमल्या कि जस पंचामृतात शेवटी मध टाकला कि चविष्ट पंचामृत तयार होत तसा दिग्दर्शक असतो आणि त्याने आपला जीव त्या सिनेमात ओतला कि मग सिनेमा उत्कृष्टच बनतो. सिप्पी नी एक उत्तम कलाकृती दिली आहे.
संवाद अर्थातच तेव्हाची गाजलेली जोडी सलीम - जावेद यांचे आहेत.
एकदा जावेद अख्तर यांनीच हा किस्सा सांगितला होता कि
अरे ओ सांबा ,कितना इनाम रखे है सरकार हमपर?
पुरे पचास हजार
हे फक्त तीनच शब्द आहेत सांभा या व्यक्तिरेखेला.
का?
कारण गब्बर स्वतः च कौतुक स्वतः च कस करणार नं?
म्हणून मग सांबाच कँरेक्टर तयार झाले.
म्हणजे डाँयलाग लिहीतांना किती बारीक बारीक गोष्टींचा ंविचार केला असेल.
तसेच सुरमा भोपाली आणि असरानीचा जेलर अफलातून, त्यांचा बोलण्याचा लहेजा मस्तच,लक्षात राहाणारा.
त्यांच्या बोलण्याच्या स्टाईल मुळे आणि गेट अपमुळे ते दोघे लक्षात राहिले."अंग्रेजोंके जमाने के जेलर....ते चालण,ती छोटी मिशी,ती काठी हातात धरण,सगळ अफलातून! जेलर म्हणजे पहिले ती भूमिकाच डोळ्यासमोर येते,असरानीची!
सूरमा भोपालीत जगदीप ह्यांनी बाता मारण्याच जे चित्र उभं केल आहे ते भन्नाट आहे.
नंतर बसंती,तिचे संवाद अफलातून लिहिले आहेत.
तुम्हारा नाम क्या है बसंती?
हे विचारतांना अभिताबने आवाजात गोडवा आणून पण नजरेतला वैताग परफेक्ट दाखवला आहे.
हा डायलॉग तर कोणीच विसरू शकत नाही.
बडबडी मुलगी दिसली कि टाकला हा डाँयलाग अस होत.
बसंतीचा एक डायलॉग म्हणजे ती सचिन ला नोकरीसाठी समजावते .
" जबतक दिल चाहा काम किया नही तो आरामसे बिडी पी ली" किती छान लाँजिक बिडीच्या कारखान्यात नोकरी करण्यामागचं.
सगळ्यात मजेशीर डायलॉग धन्मेद्र आणि अभिताब याच्यांतले आहेत.
"जरा सोच शादी के बाद मेरे बच्चे होंगे और तुझे चाचा चाचा बुलाएंगे"
अभिताब च उत्तर " मतलब मुझे तेरे यहाँ आया की नोकरी मिलेगी।".
पण अभिताब शेवटी मौसीकडे रिश्ता घेऊन जातो आणि नंतरचा सीन
अमिताभच्या,मौसीच्या सलीम-जावेदच्या, आयुष्यातला अप्रतिम, अवर्णनीय असा सीन आहे".अभिताब आणि मौसीच्या चेहेऱ्यावर चे भाव आणि अर्थात डाँयलाग जिवाचे कान करुन ऐकत राहावे असे.
"तो मै ये बात पक्की समझू?"
हा प्रश्न ऐकेपर्यंत शांतता आणि मग हास्याचे फवारे उडतात.धमाल उडवून दिली आहे दोघांनी.
एकेक सीन आपल्या लक्षात राहातो.मग तो होळीच्या वेळेस अभिताब जेव्हा गब्बर समोर वाकतो आणि रंग त्याच्या डोळ्यात टाकून बाजी पलटवतो तेव्हा टाँकिजमधे टाळ्या नि शिट्टया असतात.
पण दुर्दैवाने सुरवातीला हा सिनेमा नाही चालला, मग शेवट बदलला, मग परत आधीचा शेवट ठेवला.
अमिन सयानीने आँडीओ कँसेट काढली होती,फक्त अभिताबचेच डाँयलाग होते त्यात.कितीतरी वेळा मी आणि दादा ती कँसेट ऐकायचो.
दोघेही आवाजके जादूगर!
धर्मेंद्र चा ," मैं आ रहा हूँ गब्बर।एक एक को चुनचुनके मारूँगा।"
संजीव कूमारचा,"मौत तुम्हारे सरपर मँडरा रही हैं कालियाँ।"
गब्बर चा," कितने आदमी थे बहुत नाईन्साफी है।
किंवा
" यहाँ से पचास पचास कोस दूर गाँव मे जब बच्चा रोता है तो माँ कहेती है,सो जा नही तो गब्बर सिंग आयेगा।"
खरतर सगळेच कलाकार एकसे एक होते पण अमजद खान नविन असूनही तेवढ्याच ताकदीने अभिताब, धर्मेंद्र आणि संजीव कूमार समोर उभा राहीला. गब्बर अजरामर झाला.अर्थात प्रत्येक जण ती भूमिका जगलेत म्हणून लक्षात राहिलेत.
संवाद खरतर जंजीर,नमकहराम आणि दीवार मधले पण जबरदस्त होते.
पण शोले भावला कारण फक्त हीरो - हिरोईन च नाही तर बाकीच्या पात्रांचे संवाद अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.म्हणून मला हा चित्रपट आवडतो.
मेहेबुबा हे गाण आणि हेलन यांचा उल्लेख नाही केला तर रुखरुख लागेल मनाला.
15 आँगस्ट 1975 ला रिलीज झालेला हया सिनेमाची जादू उत्तम दिग्दर्शन, श्रवणीय गाणी,उत्कृष्ट कथा आणि संवाद, कसलेले कलाकार यामुळे अजूनही तमाम जनतेच्या मनावर कायम आहे.