महाभारत

महाभारत

मायेचा रंग आला दिसुनि
कुंती आणि नकुल-सहदेवात।
दुर्दैवाने फिका पडला तो
कुंती आणि कर्णात।

बंधुप्रेमाचा रंग आला दिसुनि,
पाच पांडवात।
कौरवांमधे वेगळा आला दिसुनि,
तो विकर्णाच्या रुपात।

मैत्रप्रेमाचा गहिरा रंग आला दिसुनि,
कर्ण आणि दुर्योधनात। उतरला शत्रु बनुनि,
तो द्रोणाचार्य आणि द्रुपदाच्या मनात।

पुत्रप्रेमाचा उत्कट रंग आला दिसुनि,
पार्थ आणि अभिमन्यूत।
आला काळ बनुनि,
तो ध्रूतराष्ट्र आणि दुर्योधनाच्या आयुष्यात।

गुरुप्रेमाचा धवल रंग आला दिसुनि,
भीष्म आणि परशुरामात।
एकलव्याला अंगठा मागुनि,
काळा रंग आला तो द्रोणाचार्यांच्या आयुष्यात।

अपमानाचा कटु रंग आला दिसुनि स्वयंवरात,
पतिव्रतेचे वस्त्रहरण करुनि,
आला राजसभेत तो बिभत्स रुपात।

किती विविध रंग आले
दिसुनी,
या महाकाव्यात।
सूडाचा रंग हाच खरा
समजूनि,
घटना घडल्या महाभारतात।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »