आज सकाळी सामान आणायला खाली गेली तर विचित्र आवाज ऐकू आला.
मी स्कूटी काढता काढता थांबली तर आमच्या कारच्या टपावर एक कबूतर फडफड करत होत आणि विचित्र ओरडत होत.
कबूतर माझ्या शत्रुपक्षात असल्याने मी त्याला हाकलायचा प्रयत्न केला तर उडत नव्हत ते आणि तेवढ्यात कारखालून म्याव म्याव असा आवाज आला.
हा पण माझा मोठा शत्रू कारण 2/3 वेळा स्कूटी च कव्हर फाडून झाले होते.
पण आता मला सगळ लक्षात आले होते.
दोन्ही शत्रुच पण आता कबूतराला वाचवण आवश्यक होत.
मी त्या मांजरीला तिथून हाकलून लावल आणि सिक्युरिटी गार्ड ला सांगून त्या कबूतराला पक्षी मित्राकडे नेऊन द्यायला सांगितल.
आणि नवऱ्याला आणि मुलाला चिकन आवडत म्हणून मी दुकानात गेली तर मांजरीच्या जागी मला मी दिसायला लागली.
मी कबूतराला तर वाचवल होत पण या कोंबडीच काय?
तिला माझ्यामुळे मरण आल होत indirectly का होईना मी कारणीभूत होते तिच्या मरणाला.
कारण मी तिला विकत घेणार होते.
काहीच न घेता घरी आली.
सिक्युरिटी गार्ड म्हणाला मँडम वो कबूतर मर गया.अच्छा होता अगर वो बिल्लीही उसको खा जाती ,बिल्ली को तो खाना मिलता।
खाडकन डोळे उघडले.
कबूतराला वाचवणारी मी कोण होती?
तशीच त्या मांजरीच्या तोंडचा घास हिसकवणारी मी कोण होती?
पण मग मी चूकीच केल का? तर नाही?
मग अस्वस्थ का वाटत आहे?
कदाचित काल उंदराला मारण्यासाठी घातलेल्या विषाने आज मला स्वतःला घुसमटल्यासारखं वाटत होत.