पाऊस
काल पाऊस,
माझ्या ही घरात
डोकावून गेला
कांदा-भजींवर
ताव मारून गेला।
मी म्हटले त्याला
थांब न जरासा
आलाच आहे तर
आल्याचा फक्कड चहा
घे जरासा।
मला म्हणाला,
चहासोबत लागतील
परत भजीच मला
कांद्याच्या ऐवजी
चालेल मिरचीही मला।
मी म्हणाले,
कांदा असो वा मिरची
बरसती जेव्हा तुझ्या सरी
भज्यांना येते मग
वेगळीच लज्जत नि खुमारी।
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»