मी न एकाकी

मी न एकाकी

मीना अग काय झाल ग एकदम तुला? हाँस्पिटलच्या रुममधे शिरताच लता ओरडली. आपल्या मैत्रिणीला सलाईन लावलेल पाहून ती घाबरली होती. दोघींचीही वय ६०/६५ होती. एकदम पक्की दोस्ती होती दोघींची. शाळेतली मैत्री! आणि दुर्दैवाने दोघीही विधवा होत्या. पण दोघीही आपापली तब्येत सांभाळून होत्या.

अग काही नाही. जरा शुगर वाढली. नको काळजी करू. तू आलीस न वाटेल आता बर. मीनाताई म्हणाल्या.

बघ अस असत. या मुलांसाठी एव्हढ्या खस्ता खा पण वेळेवर कोणी येईल तर शप्पथ! लताताई म्हणाल्या.

अग ते काय डोंबिवली-ठाणे आहे का लगेच पोचायला. अमेरिकेतून लगेच कसे येतील? आणि मी सागिंतले आहे मुलांना ऊठसूट यायच नाही म्हणून.

तर… तर तू मोठी झाशीची राणीच लागून गेली न!! लताताई बोलल्या.

हो आहेच ! अग जेव्हा मुलांना आपण अमेरिकेत शिकायला पाठवतो तेव्हा किती अभिमानाने सांगतो लोकांना. नोकरी तिकडे मिळाली की पण एकदम Proud feel करतो आणि आजारी पडलो की मुलांनी लगेच धावून यायच!! का? म्हणजे आपण त्यांना स्वप्ने दाखवायची आणि आपणच ती तोडायची? अग आपली मुले काय बाहुल्या आहेत का?

आम्ही जेव्हा विनित आणि सीमा ला US ला पाठवल तेव्हा ही वेळ येणार हे माहित होतच. मग का तक्रार करायची? आपल्याच मुलांना गुन्हेगार ठरवायचं सगळ्यांसमोर आणि लोक आपली कीव करणार. बाकी काहीही नाही. आणि मुल येतात कि दरवर्षी. तुझा लेक तर स्काँलरशिपवर शिकला पूर्णपणे. तेव्हा तर बाईसाहेब हवेत होत्या!! मग? अग आजारपणात ही येतील आपली मुले धावत. पण साध्या दुखल्या – खुपल्याला का बोलवायचे त्यांना? आणि काय ग आपण जातो का तिकडे? किती वेळा ते बोलावतात आपल्याला. आपल्याला करमत नाही तिथे. अरे मग त्यांच्या मुलांना इथे कस करमेल? लते नदीचा प्रवाह नेहमी पुढेच जातो. मागे नाही. तू गेली का तुझ्या सासरी खेड्यात राहायला? ठाणे सोडून? नाही न? सासूसासरेच आले न तुझ्या कडे. मग आता ही मुल अमेरिका सोडून कशी येतील इथे? आणि भारतात असूनही आपल्या किती मैत्रिणी त्यांच्या मुलांजवळ राहातात सांग न? फरक इतकाच कि त्यांची मुल दोन तासात येतील आणि आपली दोन दिवसात. पण जे वाईट घडायच आहे ते दोन मिनिटांत पण घडू शकत. त्यासाठी खंत का करायची? त्यामुळे आता शांत हो. मी होते ठणठणीत बरी . मग दोघीही एकदमच परत अमेरिकावारी करू. काय? तशा लताताई हसल्या. त्यांना मीनाताईंच कौतुक वाटल. आणि अग तुला मी आणि मला तू आहेसच कि!! दे टाळी!! मीनाताई म्हणाल्या आणि दोघींच हसण खोलीभर पसरल.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »