ऋणानुबंध

ऋणानुबंध

आज मुलगी सारखी मागे लागली होती कि दोस्ताना सिनेमा पाहू म्हणून. अभिषेक बच्चन आणि जाँन अब्राहम ने धमाल केली आहे. ते गे नसतात पण नाटक करतात तस. नाटक ‘ गे ‘ असण्याच? मला नाही वाटला तो सिनेमा पहावासा.

मला नीता आठवली. गोरीपान. लांबसडक केस. सुंदरच होती ती. स्थळ पहायला सुरुवात केल्यावर लगेच लग्न ठरल. मी आणि ती पक्क्या मैत्रिणी त्यामुळे मला सगळ सांगायची. अमर नाव होत त्याच. Government job होता त्याचा. MSEB त. अमर हूषार आणि हसतमुख होता. सासर पण गावातच. लग्न थाटामाटात झाले. पण 8 दिवसात नीता परत आली. आम्हाला हळूहळू सगळ कळल. आणि आज नीताची सासू तिच्याशी बोलायला येणार होती.

नीताने आग्रह केला म्हणून मी पण गेले तिच्याघरी. नीता दिसल्या बरोबर नीताची सासू तिच्या पाया पडायला लागली तशी नीता मागे सरकली आणि सासूला उठवल. त्या रडत होत्या. नीताला म्हणाल्या आम्ही तुला नाही ग फसवल. आम्हाला खरच माहित नव्हत आमचा मुलगा असा आहे ते. नाहीतर आम्ही लग्नच नसत लावून दिल त्याच. Please थोडा वेळ दे. आपण डॉ कडे जाऊ. असा तडकाफडकी निर्णय नको घेऊस. पण नीताकडच्या लोकांना लगेच घटस्फोट हवा होता. मी तर ऐकून सुन्न झाले होते. इतका धडधाकट मुलगा आणि अस. त्या बिचाऱ्या विनवण्या करून निघून गेल्या. नीताच्या घरच्यांच्या मनात मात्र फसवणूकीची भावना होती. तिचे वडील ऐकायला तयारच नव्हते.

आता मी विचार करत होते 20/25 वर्षांपूर्वी किती वेगळी परिस्थिती होती. आता लैंगिकता हा एक मान्यता प्राप्त विषय झाला आहे पण आधी परिस्थिती फार वेगळी होती. समाजात वेगळ्या नजरेने पहायचे या विषयाकडे. कोणाशी बोलायचीही चोरी होती. असो.

घटस्फोटाच जस नक्की ठरल तस नीता कडच्यांनी अमरच्या घरी कळवल तशी त्याच दिवशी अमरने आत्महत्या केली. प्रत्येकाला शेवटी समाजात इज्जत हवी असते मग भलेही एखादा गुंड राजरोसपणे फिरेल पण षंढ म्हणजे कुत्सितपणे पहायची वस्तू. एकुलता एक मुलगा होता त्या बाईचा. नवरा तर आधीच गेला होता. काय झाल असेल त्यांच. खरच कठिण झाल होत सगळ.

पण जस नीताच्या वकिलांना आणि घरच्यांना अमरच्या आत्महत्येच कळल तस त्यांनी काय केल असेल तर अमरच्या नोकरी साठी बायको म्हणून नीताचा क्लेम!! कारण घटस्फोटाची केस कोर्टात उभी नव्हती राहिली न. ती अजूनही त्याची बायकोच होती.

जग स्वार्थी असतच पण……… चांगली लोकही असतात.

सासू ने सही दिली का तर एका मुलीच आयुष्य मार्गी लागेल. नाहीतरी माझा मुलगा तर आता या जगात नाहीच आहे. किती मोठ मन.

ह्याला आपण ऋणानुबंध म्हणू शकतो का ???

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »