जाणीव

जाणीव

आई तू आणि बाबा का नाही त्या समीर च्या आईबाबांसारखे इंजिनिअर झालात? तू का अशी पोळ्या करून विकतेस? बाबांची पेपर एजन्सी आहे. तुम्ही दोघे मिळून का नाही खूप पैसे कमवत? मला कधीतरी तुम्ही पिझ्झा – बर्गर खायला नेता. माँलमधे तर नेतच नाहीत. शाळेच्या पिकनिकला पाठवत नाहीत. उगीचच मला एवढ्या मोठ्या शाळेत घातल. एखाद्या साध्या शाळेत घालायचन जिथे आपल्या सारखीच मुले जातात. मिहीर खुप नाराज झाला होता आज. त्याला आपल्यात काही कमी आहे अस वाटायला लागल होत. खुप रडायला येत होत त्याला. आशाने त्याच्या आईने त्याला जवळ घेऊन खूप समजावल पण तो नाराजच होता.

आशा खूप काळजीत होती. मिहीरला कस समजवायच हेच तिला समजत नव्हते. तेवढ्यात राजेश घरी आला. घरातल वातावरण त्याच्याही लक्षात आल होत. त्याने मिहीरला सांगितले कि चौकातल्या दुकानातून दूध घेऊन ये. तसा मिहीर रागारागात गेला. पण घरी आला तर शांत झाला होता. आशा ला आश्चर्यच वाटल. मिहीर म्हणाला आई Sorry ग, मी परत असा हट्ट नाही करणार. तस राजेश नी त्याला प्रेमाने जवळ घेतल आणि म्हणाला मिहीर तू नाही तर कोण हट्ट करणार सांग बर? अरे एखादी गोष्ट तुला हवी असेल तर त्यात चूक काहीच नाही. आम्ही लहान असतांना आम्हालाही वाटायच कि आपल्याकडे सगळच हव. तस तुलाही वाटत आणि आम्हाला शक्य असेल तर नक्कीच घेऊन देऊ तुला. मागच्या वर्षी तुला पिकनिकला पाठवल होत न. आता यावर्षी नाही जमणार. पुढल्या वर्षी परत जा. मिहीरने मान डोलावली.

राजेश म्हणाला मिहीर मी आज तुला एक गोष्ट दाखवणार आहे आणि राजेश नी मिहीरला जवळ बोलावून दुकानाचे सगळे हिशेब दाखवले. दुकानासाठी त्याने घेतलेल कर्ज, त्याचे हफ्ते ,आशा रोजचे डबे करून जे पैसे कमवते त्याचा हिशोब. त्याच्या शाळेची फी हे सगळ दाखवल. 10 वीतल्या मुलाला ते सगळ सहजपणे समजण्यासारख होत.
राजेश म्हणाला आम्ही तुला महाग सेलफोन आत्ता ही घेऊन देऊ शकतो पण तुला त्याचा उपयोग आहे का? नाही न! सध्या तुझ्यासाठी चांगला क्लास महत्त्वाचा आहे. तिथे आम्ही पैसे देऊ. मग कितीही असू दे. कोणती गरज महत्त्वाची हे प्रत्येकाला समजलच पाहिजे.

मी आणि तुझी आई हुशार नव्हतो पण देवाने तुला बुद्धी दिली आहे तर आम्हाला वाटत कि तू चांगल्या शाळेत शिकाव आणि खूप मोठ व्हाव. आम्ही शाळेची फी भरु शकतो पण बाकीच्या गोष्टी तुला देण आम्हाला शक्य नाही. अरे स्वःताच्या पैशाने गोष्टी विकत घेण्यात जास्त मजा असते. तुला माहित आहे मी लहान असतांना गावात शेतावर जायचो. 50 रु मिळायचे पाच तासाचे. सुट्टी लागली कि मी जायचो काम करायला. आजोबांनी आम्हाला शिकवल पण नाही होता आल मला इंजिनिअर आणि डॉक्टर. पण आम्ही वाईट मार्गाला नाही गेलो. मी आणि आईने चांगले पालक व्हायचा प्रयत्न नक्कीच केला. अरे आज आजोबांच्या पेक्षा आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे तू ती अजून उत्तम कर. हो की नाही! तसा मिहीर पटकन राजेशच्या कुशीत शिरला. तस आशाने पण त्याला जवळ घेतल आणि विचारलं कि दूध आणायला गेला तेव्हा तणतणत गेलास आणि आल्यावर एकदम शांत कसा काय झाला तू? आई बाबांनी मला मुद्दमूनच पाठवल होत दूध आणायला. तिथे बाजूच्या झोपडपट्टीतील मुले रस्त्याच्या कडेला थंडीत कुडकुडत बसली होती आणि येणाऱ्याजाणाऱ्याला भीक मागत होती. आई माझे डोळे उघडले. मी खरच नशीबवान आहे कि मला तुमच्यासारखे आईवडील मिळाले.
तिघांच्या ही चेहऱ्यावर समाधान होत.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »