11वी च्या अॅडमिशन ची वेळ. मी form भरायला रांगेत उभी होती. (आमच्या वेळेस आम्ही च सगळ करायचो. वडील फक्त फी चे पैसे द्यायचे.) मी रांगेत होते. तेवढ्यात एक डार्क लाल रंगाची मिडी घालून, केस मोकळे सोडलेली एक मुलगी तिथे आली. आमच्या सगळ्यांच्या नजरा तिच्या कडे वळल्या होत्या आणि तिला पण त्याची जाणीव होती.
मनात कुठेतरी नोंद झाली. मला कळल कि काँलेज 28 जून ला सुरू होणार आहे. मी ताई बरोबर काँलेज ला गेली. ताई ने मला class room दाखवली आणि चालली गेली. मी आपली एकटी उभी. हळूहळू 4/5 मूलं आली पण बोलणार कोण? सगळे जण कोणीतरी काहीतरी सांगेल याची वाट पहात होते. तितक्यात मला तीच लाल मिडी दिसली आणि दोघींनी नकळत एकमेकींना हात केला. मैत्री व्हायला हा एकच क्षण पुरेसा असतो.
तिच नाव पूनम होतं. वंदना, चित्रा, पूनम आणि मी. आमचा छान ग्रुप जमला होता. पण हळूहळू लक्षातआले कि ती अतिशय मोकळी ढाकळी आहे. बिनधास्त आहे. ते मात्र मग आम्हाला त्रासदायक व्हायला लागलं. आम्ही हळूहळू तिच्याशी बोलण कमी केल. एक दिवस आली रागारागात आमच्याशी बोलायला. तुम्ही मला का टाळता म्हणून? मी तिला विचारले तू रोज काँलेज मधे कोणाबरोबर येतेस? सगळे जण बघत असतात. आम्हाला नाही आवडत. सगळे नंतर आम्हाला विचारतात. तर म्हणाली ओळखीचा आहे आणि निघून गेली. पण दुसऱ्या दिवशी पासून काय झाल माहित नाही पण गाडी रुळावर आली होती. मग आम्ही पण जास्त ताणून नाही धरल. ट्रीप ला आम्ही 2/3 दिवस बरोबर होतो तर तिथे मैत्रिणीच्या खास मित्राशी हिची सलगी वाढली आणि परत आल्यावर दोघींच भांडण! बर हिच काही नसायच त्या मुलाशी हे आता आम्हाला ही कळून चुकल होत पण अघळपघळ वागण अंगलटी येत होत. आता कोणी या गोष्टी लक्षात ही घेत नाहीत पण 20/25 वर्षापूर्वी स्थिती वेगळी होती.
फायनल होईपर्यंत ४/५ खास मित्र झाले पण आता ते आमच्या पर्यंत येत नव्हत. काँलेज संपल तरी आम्ही चौघी भेटायचो. मग माझ लग्न झाल. लग्नाच्या दिवशी माधूरी दिक्षित style करून आली होती. 1/2 वर्षानी तिच लग्न झाल्याच कळल. पत्रिका आली पण तेव्हा माझा मुलगा अगदीच लहान असल्याने मी नाही गेली. आणि एकदा अचानक माझ माहेरी जायच ठरल. पूनम ला भेटायच होतच. तिलाही मला भेटायचं होत. तिच सासर गावातच होत पण नवरा मुंबई ला होता. मी माझ्या मुलाला घेऊन तिच्या घरी माहेरी तिला भेटायला गेली तर मला म्हणाली अग तू काय प्रत्येक ठिकाणी मुलाला घेऊन फिरतेस? तुला अडचण नाही वाटत का त्याची? मी रागाने उठून जायला निघाले तस तिच्या आईने मला आत बोलावल आणि सांगितल कि ती प्रेग्नेंट आहे. 2 महिने झाले आहेत आणि तिला अबाँर्शन करायच आहे. तिला जरा समजावून सांग. मी कसबस काकूनां हो म्हणाले आणि पूनम शी बोलायला गेले. पाठ फिरवून बसली होती. मी सरळ तिला विचारल कि तिला हे मूल नको आहे का? तर म्हणाली कि आम्हाला अजून life enjoy करायच आहे. मग ठीक आहे न. तुम्ही दोघे काय तो निर्णय घ्या. तर ती म्हणाली कि हे फक्त मी, तिची आई आणि ती या तीन च व्यक्ती ना माहिती आहे. म्हणजे तिने ही बाब नवऱ्याला पण सांगितले नव्हती. आता मात्र माझ डोक फिरायची वेळ आली होती. मी तिला सरळ विचारल तू काय घर-बिर सोडून आलीस की काय? तर हो म्हणाली.
का बर?
माझा नवरा खूप माँडर्न आहे. त्याला खूप मैत्रिणी आहे आणि ते जरा तिला अति वाटत होत. तिला वाटत होत कि तिच्या नवऱ्याचं त्याच्या एका मैत्रिणीशी अफेअर आहे. मी तिला विचारलं कि तिच्या जवळ काय प्रुफ आहे? हे विचारण चूकीच होत. पण तिला बोलत करण आवश्यक होत. तर म्हणाली तिला तस वाटत आहे. म्हणजे सगळ हवेतच. मग मी तिला म्हणाले कि काँलेज मधे असतांना आम्हालाही वाटायचं कि तुझ या या मुलाशी अफेअर आहे, होत का तस?? नाही न?
मी तिला समजावत होते कि मला स्वतःला हेच कळत नव्हत.
मग रडायला लागली. तिला म्हटल चल आपण आत्ता जाऊ आणि बोलू त्याच्याशी प्रत्यक्ष. तर त्यालाही तयार नाही. काकू पण रडायला लागल्या. शेवटी मी तिला विचारलं, “पूनम तू काही उद्योग केले आहेस का? खर खर सांग ? नाहीतर मी चालली आता घरी. खुप झाल आता”. माझा संशय खरा ठरला होता. नवऱ्याच्या मित्राशी ती परत अघळपघळ वागली होती आणि त्याला हिचा संशय आला होता म्हणून नवऱ्यानेच हिला परत पाठवले होते. काकू तर तिला मारायलाच धावल्या. स्वभावाला औषध नाही हे मान्य पण संसार मोडीत निघेपर्यंत? हे जरा अतिच झाले होते. शेवटी तिच्या नवऱ्याला बोलावून सगळ बोलायच ठरल. माझी संध्याकाळी ६ ची ट्रेन होती आणि 2 दिवसांनी मी अमेरिकेला जाणार होती. पण डोक्यात कुठे तरी तिचेच विचार होते. बर इतर मैत्रिणींनाही काही विचारता येत नव्हते. नंतर खूप चौकशी केली पण ते सगळे जण कलकत्त्याला गेले एवढच समजल. मग मी ही संसारात रमले. पण तिची आठवण आली कि बेचैनी येते. तिने काय निर्णय घेतला असेल? नवऱ्याकडे परत गेली असेल का? असंख्य प्रश्न डोक्यात आहेत. आता जवळजवळ 25/26 वर्ष झालीत या गोष्टीला.
‘ती सध्या काय करते’ हा सिनेमा पाहिल्यावर पूनम चीच आठवण आली एवढ मात्र नक्की.