मोहमयी

मोहमयी

मी आहे फिल्मी दुनिया
अवघ्या जगाची मोहमाया।

प्रत्येकाला वाटे इथे यावे
नाव आणि पैसा कमवावे
पण नाही मिळत इथे
प्रत्येकालाच ‘आनंद’
असले कितीही त्याचे
इरादे ‘बुलंद’।

प्रत्येकाला लागतो एक ‘गॉडफादर’
नसेल तर नाही बनत
मग तो ‘सिकंदर’।

निराशा च पडते पदरी
कितीही केली जरी ‘हेरा-फेरी’।

माझे आहे वेगळे रंग-ढंग
नजर टाकाल तर होईल
मति गुंग ।

इथे कोण कोणाशी करत ‘शादी’
प्रत्येकाच्या ‘लव’ ची भली मोठी यादी।

मी नाही काबूत येणार
सहजासहजी
लावावी लागते पणाला
स्वतःची ‘जान ‘आणि ‘बाजी’।

माझी ‘आशिकी’ वेड लावते
‘वास्तव’ दिसल कि
तुमचा जीव घेते।

आहे मी एक मोह ,स्वप्न
पण सहज पुर्ण न होणार
कधी कोणाला ‘बेनाम’ तर
कोणाला ‘शान’ देणार।

कामयाबी मिळते ज्यांना
जातात ते उंचीवर
नाकामयाब होतात ते
पडतात उताणे जमिनीवर।

माझ्या कडे येतांना विचार करा जरा
कारण ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »