मोबू


मोबू
शोध लागला नव्हता जेव्हा मोबाईलचा आधार होता तेव्हा पत्राचा । आता मात्र हरवला तो ठेवा जो दूर करीत असे दोन जीवांतला दुरावा । मोबाईलचा मेसेज असतो नश्वर अजरामर होते आपले लेटर । जतन होत होते आठवणींचे साक्ष होते ते गोड क्षणांचे । आज आला मोबाईल घराघरात गेला तो सुवर्णठेवा भूतकाळात । कुठे ते लिहिलेले चार पानी पत्र आणि कुठे हा ढापलेला मेसेज चित्रविचित्र । मोबाईल नव्हता तेव्हा फिरत होतो सगळीकडे सेल्फी चे फँड नसल्याने डोळ्यातच साठवत होतो सह्याद्रींचे कडे । नव्हता मोबी त्यामुळे हात पुढे करु शकलो मदतीचे करत नाही बसलो शुटींग अपघाताचे । नाही मिळाल्या likes तरी मिळाले त्यांचे आशीर्वाद कितीतरी।


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
0 162