छकुला


छकुला
आई किती ग हाका तुला मारल्या, का नाही ग आलीस घ्यायला तुझ्या छकुल्याला। मी होतो ग झोपलो मजेत येऊन तिने घेतले मला कवेत, झाली जिवाच तगमग सहन होईना त्या आगीची धग। जिवा चा केला ग आकांत पण सगळ होत शांत नि निवांत, पळायला नव्हती ग पायात माझ्या शक्ती अशी कशी होती ग आमची नियती। अस वाटत आई उगीच केली या जगात यायची घाई, असतो पोटात तुझ्या सुरक्षित शांतपणे करत गाई गाई। आमच्या अनमोल जिवाचे, लावले ग त्यांनी मोल। हिच का ग केली किंमत आपल्या नात्याची, तू मात्र जाणीव ठेव आपल्यावर झालेल्या अन्यायाची आणि आठवण काढत जा आई कधी कधी तुझ्या या छकुल्याची।


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
0 204