जाडसर

जाडसर

ए जाडे,अशी हाक ऐकताच
मी त्या सुकट बोंबिलकडे पाहिले
तिच्या कुत्सित नजरेला उत्तर
देत चांगलेच झापले।



ही वाळकी शेंग स्वतःला
करीना समजणार।
शाहिद नाही नि सैफूही नाही
हणमंत रावांच्या गळ्यात माळ घालणार।

हिचे खाण्याचे नखरे हजार
पाहूनच आपण होतो गपगार।
कसची ती झिरो फिगर-बिगर
बापाच्या जिवाला नुसताच घोर।

झिरो फिगर बनवून होत नाही
सगळ्याच करीना-वरीना।
एक नंबरचा अभिनयही
अपेक्षित असतो प्रेक्षकांना।

असशील चवळीची शेंग
असशील झिरो फिगरवाली।
पण आजकाल महत्त्व आहे
निर्मीती आणि विशाखालाही।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »