हो स्त्री ला मान द्यायलाच हवा.प्रत्येक वेळेस तिला देवीची उपमा न देता एक माणूस म्हणून तिच्या गरजा पूर्ण केल्यात तर तो ही तिचा मान ठेवल्या सारखे च आहे. मला वाटतं घरी शौचालय बांधून तुम्ही तो देऊ शकता. तुमच्या घरी शौचालय नसेल तर तो तिचा अपमान आहे.
1/2 राज्यात बायका जेव्हा सकाळच्या आवश्यक कामासाठी शेतात जातात तेव्हा काही पोर दुरून दगड मारायचे किंवा श्वापदांचे आवाज काढून त्यांना घाबरवायचे.मजा घ्यायचे. आणि हे जेव्हा लक्षात आणून दिल्या गेले तेव्हा तिथले नेते म्हणाले , ” बच्चे है छोड दो ,मस्ती तो करेंगे ही।” अस वाटत म्हणाव तुम दुनिया छोड दो!
साध तुळशी बागेत जायचं म्हटल तरी विचार येतो खूप वेळ लागला तर ?बाथरूम ला जायचं कुठे? मग काय धरून ठेवायची.ज्यांना शुगर चा त्रास आहे,दर 2/3 तासांनी जाव लागतं त्यांच काय?
प्रवासाला निघतांना तेच.
एकदा पुणे – नागपूर खाजगी बसने जायची वेळ आली .1600/1700 एकाच तिकीट होत.संध्याकाळी 8 ची बस होती. घरून 7 ला निघालो.8:30 झाले तरी बसचा पत्ताच नाही. मग मात्र माझी नजर भिरभिरायला लागली. अहो जरा बघा बर कुठे washroom दिसते आहे का?कुठे ही नव्हत.मग चिडचिड व्हायला लागली. एवढाले पैसे घेऊन साधी बाथरूम नाही बांधता येत.रोज हजारो प्रवासी येण जाण करतात.पैसे मोजुन घेणार. बायकांची सोय काहीच नाही.मी तिथल्या माणसाला विचारलं तर म्हणाला तिकडे पेट्रोल पंपावर जा.10 मिनिटं चालत जाव लागेल.मी त्याला म्हणाले बस थांबव तिथे.पण तिथे ही काही खुप ग्रेट होत अस नाही. पण आडोसा होता इतकच.
पण अस का घडत? स्त्री ची मूलभूत गरज कोणीच नाही समजून घेत आणि कसचा तिचा मान ठेवता?
ज्या बायकांची पाळी सुरू असते त्यांच तर कठिणच असत.चुकून प्रवास करावा लागला तर वाट लागते. बऱ्याच शाळांमध्ये एव्हढाली फी घेतात पण 5/6 बाथरूम हजार मुलांच्या मागे.मंदिरात पण तिच स्थिती. लोक 2/3 तास प्रवास करून दर्शनाला येतात. पण बायकांना जायला सोय काहीच नाही.
काही बायका प्रवासाला निघतांना पाणीच पित नाही का तर जाव लागू नये म्हणून.किती कोंडमारा होतो स्त्रियांचा.मला वाटतं एवढे रस्ते बांधण सुरु आहे .कमीत कमी
100 कि.मी. वर स्वच्छताग्रुहांची सोय करा आणि स्त्रीच्या मूलभूत हक्काचा मान ठेवा🙏🏻