गुढीपाडवा

गुढीपाडवा

असा गुढीपाडवा आयुष्यात परत नको रे देवा।
ज्याने करायला लावला घडी-घडी तुझा धावा।

नववर्षाची सुरवात कित्येकांची झाली दुःखाने।
होरपळले कित्येक जीव
जिवलगांच्या विरहाने।

अस वाटतं परत एकदा
रामरायाने घ्यावा जन्म ।
रावणापेक्षाही भयंकर असलेल्या करोनाला
करावे जेरबंद।

अस वाटत परत एकदा
व्हावे समुद्रमंथन ।
निघालेल्या हलाहलातून
व्हावे करोनाचे दहन।

अस वाटतं परत एकदा
यावे परशुरामांनी धरतीवर।
निष्क्रिय करून कोरोनाला
करावे आमचे जीवन सुखकर।

एकच मागणे देवा तुला फिरूनि आता
असा गुढीपाडवा
परत नको आता।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »