"मग, मी अजिबात खोट्या बातम्या पुरवतं नाही", चम्या म्हणाला.
खरतरं चम्या ने एका पेपरला इतक्या खोट्या बातम्या पुरवल्या होत्या कि शेवटी ते पेपरवाले कंटाळून खऱ्या बातम्या छापायला लागले होते.असे अनेक अतरंगी विक्रम चम्याच्या नावावर आहेत.
"अरे चम्या तुझ्या खोटेपणावर माझा खरा खरा विश्वास आहे रे!!" मी एक शालजोडीतली हाणलीच.
"अरे लेका तुझ्या सवयींचा पाढा वाचला नं तर हा टेबल ही लाजेल रे!".
मी म्हणालो.
"तो कसचा लाजतो रे भावड्या?सगळं माहिती आहे त्याला!
उलटा कर! त्याच्या खालूनच तर ........
ते जाऊ दे!"
चम्याने विषय बदलला.
"अरे, तुला माहित आहे का?"
" काय रे काय?" मी उगीचच उत्सुकता दाखवतं विचारलं.
नाहीतरी मला काम काहीच नव्हतं.
"आपला करोना बदल गया हैं यार!!
आता पोट दुखलं तर करोना, अंग दुखलं तर करोना आणि हो दातात कळ आली तरी करोना असू शकतो बरं का!" चम्या म्हणाला.
मी खुर्चीवरुन पडता पडता वाचलो आणि जोरात शिंकलो.
मी लगेच मास्क काढला.
तसा चम्या ओरडला "अरे लाव रे तो मास्क!!
शिंकतो आहेस तू!!"
"अरे, तूच म्हणालास नं आत्ता कि करोना बदल गया हैं।
मग कशाला हवा तो मास्क?" मी मास्कवरची धूळ झटकतं विचारलं.
"नको रे लाव ती पट्टी आधी",चम्या ओरडला.
तितक्यात वेटर बिल घेऊन आला. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. खिशात हात घालायचं नाटक केलं.
तसा वेटर म्हणाला, " नाटकं बसं झाली, चुपचाप पैसे काढा. मी पण तुमच्याच आँफिसमधे कामाला होतो आणि माझाही जाॅब गेला आहे".
बेकारीने सगळ्यांनाच स्पर्श केला होता तर!
चम्या बोलला, "तरीच म्हटंल चेहरा ओळखीचा का वाटतोय?एवढा राजबिंडा चेहरा मी कसा विसरेन? किश्याना रे तू?"
माझ्याकडे बघत चम्या म्हणाला,
"अरे भाऊ,आपल्या बिझनेस मधे एका पार्टनर ची गरज आहेच. याला घेऊन टाकू. महिना 10,000 देऊ".
आज मला हार्ट अॅटॅक येणार होता हे नक्की.
मी त्याच्याकडे पाहिले तसं त्याने बारीक मधे मला डोळा मारला आणि तसही महिन्याला दहाहज्जार रुपये देणाऱ्या बिझनेसमध्ये मलाही इंटरेस्ट आला होताच.
चम्या ने पाॅझ घेतला, दोन्ही हाताची घडी घातली, चष्मा नीट बाजूला काढून ठेवला आणि माझ्या आणि किश्याकडे बघतं म्हणाला, "सावकाराचा मुलगा डेंटिस्ट आणि सून हाडांची डॉक्टर आहे. हाडाची नाही.
त्यामुळे करोना काळात मुलगा दाताला दात लावून घरीच बसला आहे आणि सूनेच्या हाडांची काड व्हायची वेळ आली आहे.
मग मीच सावकाराला सल्ला दिला कि दातं दुखलं कि करोना, अंग दुखलं कि करोना असं लोकांना सांगायचं कि मग लोक तुमच्या मुलाकडे आणि सूनेकडे येतीलं." एवढे सगळे एका दमात बोलून चम्या उर्फ चिंतामण डोईफोडे थांबला.
"अरे, पण तू तर पोटं दुखलं कि पण करोना होणार अस म्हणाला होता ना मगाशी", मी विचारले.
"अरे भाऊ, ते काय आहे माझी मेव्हणी आहे नं, ती पोटदुखी वर रामबाण औषध देते म्हणून मी आपलं पोटदुखी पण जोडली त्यात!".
"धाकटी कि थोरली रे?"
किश्याने साळसूदपणे विचारलचं.
"तू माझा फक्त बिझनेस पार्टनर आहेस", चम्याने किश्याला त्याची जागा दाखवली.
आणि पुढे बोलायला सुरुवात केली,
" तर आपणं काय करायचं. रोज इथे येऊन गप्पा मारायच्या कि करोना ची लक्षणं बदलली आहे. सर्दी, खोकला हे आधीच्या करोनाची लक्षणं होती आता तिसऱ्या फेजमध्ये दात, सगळी हाडे आणि पोटं दुखणं ही नविन करोनाची लक्षणं आहेत.
आणि किश्या तू अधूनमधून चहातं जुलाबाचं औषध टाकायचं आणि चव वेगळी लागली कि करोना स्पेशल चहा आहे असं सांगायचं. काय?"
चम्याने बरंच होमवर्क केलेले होते.
" पण लोक का विश्वास ठेवतील आपल्यावर?"
मी विचारलं.
चम्या म्हणाला, " अरे लेका अजय देवगनचा दृश्यम पाहिला नं? 2 आँक्टोंबर!!याद हैं नं!!
एकच गोष्ट दहावेळा सांगितली कि लोकांचा
विश्वास बसतो रे! ह्युमन सायकाॅलाॅजी आहे ही! आणि करोनाच्या बाबतीत लोक नक्कीच विश्वास ठेवतात. जरा ठासून सांगता आले पाहिजे".
"ठरलं तर मग !
आणि आपण लोकांना सतत सांगायचं की आत्ताच्या करोनामुळे
दातदुखी, सांधेदुखी आणि पोटदुखी ही होऊ शकते. महिन्याला सावकाराकडे 15/20 पेशंट गेले की आपले दहाहजार पक्के. वर्षांत लखपती होऊ आपण!आहेस कुठे?"
"अरे ,असा कसा संपेल?
त्याचा भाऊ-बहीण,काका-मामा कोणीतरी जन्माला येतीलचं कि!!असा कसा मरू देईल मी कोरोनाला? चम्या तावातावाने बोलतं होता.
तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली, तिकडून त्याची बायको सांगत होती कि सासुबाईंचे बत्तीसच्या बत्तीस दात कडकड वाजतात आहे. डाॅक्टरांनी सांगितले आहे की ताबडतोब डेंटिस्टकडे न्यायला हवं. १०१ टक्के ही करोनाचीच लक्षणे आहेत. पन्नास हजार डिपॉझीट द्यावे लागेल.
म्हणजे आपल्याआधीच कोणत्या तरी महाभागाला हे सुचलं आहे तर.......