मला खूप हळहळ वाटते कि तेव्हा व्हँलेनटाईन डे का नव्हता?
म्हणजे अगदीच नव्हता अस नाही पण तो पेपरमधे वाचण्यापुरता किंवा सिनेमात पहाण्यासाठी एवढाच होता.
तेव्हा जे लोक लव-मँरेज करायचे त्यांच कौतुक करावे तेव्हढे थोडे!
तेव्हा मुलीच्या घरावरून चकरा मारणे, तिच्या बेंचवर गुपचुप चिठ्ठ्या ठेवणे किंवा बेंचवर करकटकाने I Love You लिहिणे हे प्रकार जास्त होते. तसेच घरी ग्रिटींग पाठवणे हा पण एक प्रकार होता. तेव्हा ग्रिटींग मात्र खरच खूप छान छान मिळायची. पण असलं काही डे वगैरे साजरं नाही केलं.
पण भगवानने हमारे नसिब मे ये दिन लिखा था।
तर सांगायचे म्हणजे आमचा व्हँलेनटाईन आमच्या जन्मदिवशी साजरा झाला. आता तुम्ही हसाल हे काय भलतचं. पण झाल खरं अस.
मुलींना या गोष्टीची जरा आवड असते नाही म्हटल तरी! तिने आमच्या अहोंना विचारलं कि बाबा उद्या आईला काय देणार?
मी काय देणार तिला? सगळचं तर तिच आहे. टिपिकल नवऱ्याचे उत्तर!!
तस नाही बाबा पण आईला काय आवडतं?
मी पण आतून या उत्तराची आतुरतेने वाट पहात होती.
………………
……………..
बहुतेक नवरोजी डोक्याला ताण देत असावे.
नंतर जेवण झाली. आवराआवर झाली.
माझ BP नक्कीच 120 च्या वर गेले होते.
आणि मग उगीचच डोळे भरून यायला लागले.
माझी साधी आवड पण नाही माहित या माणसाला. फुकटं गेल आयुष्य. (दरवर्षी गाडगीळांकडे मारलेल्या फेऱ्या मी विसरले होते.)
मी जरा घुश्शातच झोपले तर अलार्म वाजला. Happy birthday ची ट्यून आणि समोर नवरा हातात 40 टवटवीत लाल गुलाब घेऊन उभा होता आणि मागून माझी कळी गालात हसत मला wish करत होती.