स्थित्यंतर
एक पहाट आयुष्यातली
नाचत आली आनंदाने
घेतली मी ही गिरकी मग तिच्या तालात संगतीने।
एक दुपार उदासवाणी
रेंगाळत आली मंदगतीने
सुस्तावली मग मी ही
जराशी तिच्या निरस सोबतीने।
एक संध्याकाळ हुरहुरणारी
सजली सोनेरी-केशरी रंगाने
रमली मी ही आठवणीत
तिच्या सुंदर साथीने।
एक रात्र विरहाची
ह्रदयात आली आर्ततेने
व्याकूळ होऊन मी ही विरहात
बरसले अश्रूंच्या लडीने।
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»