सावित्रीबाई

सावित्रीबाई

सावित्रीबाई आज तुमची आठवण येते भारी।
तुमच्या लेकिंना बघायला या एकदा अवनीवरी।
उद्देश तुमचा स्त्री शिक्षणाचा होता खूपच चांगला,
पण तुमच्या लेकिंनी त्याचा भलताच अर्थ लावला।
स्त्रीचे स्त्रित्व लावले उधळून,
अर्धेच कपडे आणि पदर गेला उडून।
शिक्षणासोबतच संस्काराची तुम्ही भाषा शिकवली,
त्याच संस्कारांची तिने व्याख्याच बदलवली।
तुम्ही धडा दिला आर्थिक
स्वावलंबनाचा,
निघाला त्यातून अर्थ
व्यक्तिस्वातंत्र्याचा।
तुम्ही तुमच्या लेकिंना “बाई” पणाचा अर्थ समजावला,
पण त्यातून फक्त “मी” पणाच फोफावला।
तुम्ही दिली शिकवण समानतेची,
पण अर्थार्जनात ती बनली
चढाओढीची।
सावित्रीबाई परत या इथे फिरुनी,
घालण्या अंजन तुमच्या लेकिंच्या नयनी।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »