अत्यंत जवळची, आवडती आणि दिल के पास असलेली एक ना एक 'प्रियतमा' प्रत्येकाची असतेच असते.
माझ्या प्रियतमेशी माझी ओळख साधारणपणे चौथी/पाचवीत असतांना झाली. तेव्हा ती थोडीशीच आवडायची पण नंतर मात्र मी तिच्या प्रेमातच पडले. माझी एक मैत्रीण अनुपमा तेलमोरे रोज शाळेत तिच्यावर स्वार होऊन यायची. तिची ती दोन चाके, छोटीशी सुबक सीट आणि ती ट्रिंग ट्रिंग वाजणारी गोड घंटी! मी त्या प्रियतमेच्या म्हणजे सायकलच्या प्रेमातच पडले. केव्हा मधली सुट्टी होते आणि त्या सायकलवर स्वार होऊन गरगर ग्राऊंडवर चकरा मारते असं मला व्हायचं पण तिच्या प्रेमात पडणारी मी एकटीच नव्हते काही! बऱ्याच जणी होत्या. पण मी वर्गाची कॅप्टन! त्यामुळे तिच्यावर स्वार होण्याचा पहिला मान माझा!
मग घरी आल्यावर दादा आणि ताईच्या सायकलवर प्रयोग व्हायला लागले पण चार पाच वेळा पडले कारण त्या दोघांच्याही सायकली उंच होत्या मैत्रीणीची सायकल कमी उंचीची होती.पण अडथळ्यांनी मागे हटेल ते प्रेम कसले?
मग बाबांच्या मागे लागले सायकल हवी म्हणून! बाबा म्हणाले की सातवीत गेली की सायकल मिळेल तोवर पायीच जायचे. रडून पडून झाले पण व्यर्थ!
विरह काय असतो! देवा! डोळ्यात पाणी वगैरे आले पण त्या पाण्याची किंमत घरी शुन्य होती! अजून दोन वर्षे वाट पहावी लागणार होती. अर्थात सायकल चालवणे सुरुच होते. पण हवं तेव्हा चालवायला नाही मिळायची. कधी चाराणे देऊन अर्धा तास सायकल भाड्याने आणायची आणि मग चालवायची. कधी दादा ताईच्या मिनतवाऱ्या करून!
आमच्या हातवळणे बाई नऊवारी नेसून सायकलवर शाळेत येत असतं. खूप अप्रूप वाटायचे त्या गोष्टीचे!
सगळ्यात तर पोस्टमनचे कौतुक वाटायचे. सायकल थांबे थांबेपर्यंत तो पत्र गर्रकन अंगणात फेकून क्षणात सीटवर बसायचा! सुपरमॅनच्या थोबाडीत मारेल अशी त्या पोस्टमनची स्टाईल असायची. सायकल शिकल्यावर तो प्रयोग करून पाहिला पण जोरात तोंडावर पडले,हातापायाची वाट लागली. पोस्टमनला रामराम केला.
आमच्यापेक्षा मोठ्या ताया सायकलवर बसून जेव्हा शाळेत जायच्या तेव्हा तर जाम राग यायचा. सातवीची वगैरे काय अट! आईला ही मस्का मारुन झाला पण निष्कर्ष सातवी!
सहावीचा रिझल्ट लागल्यावर बाबांनी कबूल केल्याप्रमाणे सायकल घेऊन दिली. मग काय हवेतच! अख्खं गाव पालथे घातले. मैं चली मैं चली झाले होते. सायकलवर पकडापकडी खेळत पूर्ण कॉलनीत हुंदडायचो!
काही वर्षांनी मात्र प्रियतमा बदलली. बाबांजवळ स्कूटर होती. हमारा बजाज! ती सकाळी उठून शिकायचा प्रयत्न केला पण एक दिवस जोरात पडली. मलाही लागले आणि तिलाही! बाबा म्हणाले काही नको स्कूटर वगैरे शिकायला! लग्न झाल्यावर जे करायचं ते कर! आपल्या पिढीला हे एक वाक्य फार म्हणजे फारच ऐकावे लागले.
एकदा वाटलं ती स्कूटर बाबांची 'प्रियतमा' असावी कदाचित! माझ्या सायकलसारखी!
असो स्कूटरप्रेम थोडक्यातच संपल!
पण नंतर आयुष्यात स्कूटी आली आणि मी तिच्या अखंड प्रेमात बुडाले. बावीस वर्षांनी ती म्हातारी झाल्यावर मात्र नाईलाजास्तव तिला देऊन दिले. तो दिवस खूप वाईट गेला. तिने कधीच मला किंवा माझ्या मुलांना साधा ओरखडा ही नाही येऊ दिला. प्रेमाने साथ दिली. ती माझी दुसरी प्रियतमा!
नंतर मात्र माजदा, कॅमरीवर प्रेम केले पण त्या सायकलची - प्रियतमेची सर कोणालाच नाही!
जयाप्रदा तू श्रीदेवी तू
तूच माझी हेमा!
प्रियतमा प्रियतम्मा
हे गाणे ऐकले की माझ्या डोळ्यासमोर फक्त ती सायकल येते! क्या करु? दिल है के मानता नहीं!
(आता अमेरिकेतील मोकळ्या रस्त्यांवर तिच्यावर स्वार होऊन जुन्या आठवणी ताज्या करायच्या आहेत)
वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak