कवचकुंडले

कवचकुंडले

आई टॉवेल दे न! माझ्या मैत्रिणीची लहान मुलगी आतून ओरडली. आम्ही दोघी Tv वर उर्मिलाला कमीत कमी कपड्यात जँकीसोबत नाचतांना बघत होतो. माझी मैत्रिण ओरडली थांब मी आले, बाहेर नको येऊस आणि लगेच मुलीला टॉवेल द्यायला गेली.

एकदम मनात विचार चमकून गेला कि आपण सर्व सामान्य लोक पूर्ण कपडे घालूनच बाथरूमच्या बाहेर येतो. मग या नट्या कशा काय उघड्यावर उघड्या होऊन फिरतात? मी माझ्या एका मैत्रिणीकडे गप्पा मारायला गेली. कारण हा माझ्यासाठी (इतरांच माहीत नाही). खूप महत्त्वाचा प्रश्न होता.
ती बऱ्यापैकी सामाजिक कार्य करत असते आणि मानसोपचारतज्ज्ञ पण आहे. मी तिला माझ्यासाठी महत्त्वाचे असणारे काही प्रश्न विचारले.

1) आपण सामान्य लोक जर कपडे न घालता कोणासमोर येत नाही तर या नट्या कसकाय अस वागू शकतात? बर जुन्या नट्या तर नीटनेटके कपडे घालून काम करायच्या आणि त्यांचे सिनेमे चालायचे. बर पैशासाठी म्हणाल तर खूप पैसा मिळाल्या वरही त्या तशाच वागतात. का?

2) बऱ्याच मुली/ बाया छोट्टीशी पँट आणि छोट्टासा टाँप घालून का हिंडतात? वय लपवायला? कि मी किती आधूनिक आहे हे दाखवायला? कि इतके दिवस लोक माझ्याकडे बघायचे आता बघत नाहीत म्हणून? कि नवऱ्याने दुसऱ्या मुलींकडे पाहू नाही म्हणून? नट्यांच जाऊ दे ग. पण आपल्या आजूबाजूच्या मुली पण असेच कपडे घालतात. का?म्हणजे काय कारण आहे या मागे? बर त्यामुळे यांना समाजात मान मिळतो तर ते ही नाही. यांचा confidence वाढतो का? तर नाही. मग कारण काय ?

मैत्रीण म्हणाली, थांब जरा पाणी पी आणि शांत बस.
सगळ्या दुनियेची जबाबदारी तू घेतली आहेस का?

नाही.

मग काय problem आहे?

अग ती मुलगी मोठाल्या गळ्यांचे टीशर्ट घालून बसली असते आणि ती मुलं मजा घेत असतात.

फक्त मुलं?

कशावरुन ती मुलगी enjoy नसेल करत? ती तेव्हा स्वत:ला हिरोईन समजत असेल.

पण हिरोईन ला संरक्षण द्यायला bodyguard असतात. आपल्या पोरींच संरक्षण कोण करणार?

Point आहे. मैत्रीण म्हणाली.

मग उपाय काय?

कशाला हवा आहे उपाय? अनुभव आला कि वठणीवर येतील.

अग पण म्हणून वाट पहायची?

आपण आपल्यापुरत पहायच.

काही प्रश्नांची उत्तरे शोधायच्या भानगडीत पडू नये. फुकटचा सल्ला.

माझ्यासाठी जी
कवचकुंडले होती ती आज बेड्या बनली होती आणि बेडी ही तोडण्यासाठीच असते न??

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »