चिंतन एका नवऱ्याचे
नवरा पडला विचारात
नेहमीच का घडते असे
बायको नेहमी असून सुखी, जगाला दुःखी का भासे।
दिसत तस नसत म्हणूनच जग फसत
हा नियम इथे दुनिया का विसरते।
ती जेव्हा सोडते
जीभ सैल
मी तेव्हा झापड लावून
होतो नंदीबैल।
बुगुबुगु मान हलवितो
कोणताही ना विरोध करतो।
तिच्या प्रत्येक कार्याला असते माझी स्वीक्रुती
विचारात घेत नाही जरी ती माझी संमती।
मुस्काटदाबी म्हणजे काय ते नवऱ्यालाच कळते
मगरमच्छ के आँसू का जगाला खरे वाटते।
कुठे शोधावा आसरा
काहीच त्याला कळेना
अर्धागिंनी शिवाय नाव दुसरे आठवेना।
शेवटी म्हणे गड्या
सोडाव्यात आपल्या सगळ्या खोड्या
तीच असते बरोबर
माझ्या तिच्या
जीवावरच तर उड्या।
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»