हुकूमाचा एक्का


हुकूमाचा एक्का
राहून राहून मनात येई कधी होणार मी हुकूमाचा एक्का । आणि हक्क गाजवून चालवेन माझाच हेका। आई म्हणाली, कुठला आपल्या बायकांच्या नशिबात एक्का-बिक्का आपला तर नेहमी खोटाच सिक्का। बाबा म्हणाले हसुन खरा का हा तुझा तुक्का, असली एक्का तर तू ,तुझ्यामुळे घराचा पाया आहे पक्का। जोकर तर मी या घरचा दुःख न दाखवता चेहरा हसरा ठेवणारा जिथे कमी ती जागा भरणारा। आई म्हणाली रुसून, नको जोकर नको राजा समान आपला दर्जा खरे आपण राणी- राजा घेऊ आयुष्याची मजा।


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
0 185