नातं निसर्गाशी

नातं निसर्गाशी

नाते जडले निसर्गाशी मनाचे
कुटुंब दिसे मज त्यात
आमचे।

जुना औंदुबर देई छाया
आठवे मला वडिलांची माया।

जाईजुई मज घेती लपेटुनि
आईच्या प्रेमाची भावना येई
उंचबळूनि।

पेरुच ते झाड भासे
मज दादासम
वरूनि कडक तरी
आतून असे मऊ मुलायम।

अबोली ती भासे माझी ताई
माझ्या मदतीला जी नेहमीच धावून येई।

काटेकोरांटीत भासे आजोबाची छवी
कठोर वचने बोलून
पाय जमिनीवर माझे ठेवी।

आजी असे माझा गुलाब
नेहमीच माझ्यासाठी हजरजवाब।

अशा सुंगधी कुटुंबातील
मी एक कळी
फुलवून सारे जग, मी
घेईन माझ्या ओंजळी।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »