आशा

आशा

नसतेस घरी तू जेव्हा जीव……….
मोहन ने लगेचच गाण बंद केल.आशाच्या आठवणीने तो कासाविस झाला होता.
आशा त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणारी त्याची बायको आज आजारी होती.त्याच लक्षच लागत नव्हते.

रेखाच्या जन्माच्या वेळेस ते न्युर्जसी ला होते.आशाला तेव्हा खूपच कडक डोहाळे लागले होते. दिवसाला 4/5 उलट्या व्हायच्या.ऋतुज तेव्हा 6 वर्षाचा असेल.त्या दोघांना भूक लागली कि बर्गर मागव,पिझ्झा मागव अस व्हायच.पण आशाला ते नको असायचं. तिला गरमगरम खिचडी / सूप हव असायच पण मोहनला स्वयंपाकात अजिबात इंटरेस्ट नव्हता. हे त्यानी लग्नाच्या आधीच तिला सांगितले होते. साधा कुकर पण त्यानी कधी लावला नाही.मग स्वतःच उठून आशा काहीतरी करायची आणि खायची. शनिवारी आणि रविवारी मात्र तो ठरवून तिला इंडियन रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचा.बाहेरून हव ते मागवायचा.कधीही पैशाकडे पाहिले नाही पण किचनमधे नाहीच.

आशा म्हणायची, अरे मला शिरा खावासा वाटतो आहे जरा रवा भाजून दे न.पण तो सरळ नाही म्हणायचा.किचन हे माझ क्षेत्र नाही.हा डायलॉग मारुन मोकळा व्हायचा.

नंतर तिचे आई-बाबा आले.आशाची तब्येत सुधारली.रेखाचा जन्म झाला.

आज वीस वर्षांनी मोहन करोनाने आजारी पडला होता. आशा हरप्रकारे त्याची काळजी घेत होती. गरमागरम पदार्थ त्याला खायला मिळत होते. वेळेवर काढा द्यायची. रेस्टॉरंट बंद, बायका नाहीत.त्यामुळे आशाची फरपट होत होती आणि एक दिवस व्हायच ते झालच.आशा करोना पाँझिटिवह आली होती. दमा असल्यामुळे ऋतुज ने तिला हाँस्पिटलमधे ठेवल होत.

मोहन 17/18 दिवसात बरा झाला.
आणि आज आयुष्यात पहिल्यांदाच मोहनने किचनमधे पाय ठेवला होता. आशा साठी त्याला मऊ खिचडी आणि सूप करायच होत.
तिच्या डोळ्यातील आशेकडे त्याने नेहमीच दूर्लक्ष केले होते पण आज त्या न सांगितलेल्या अपेक्षा त्याला पूर्ण करायच्या होत्या.

त्याने डबा भरला आणि हाँस्पिटलला जायला निघाला.हळूच डब्यात एक चिठ्ठी पण टाकली.
कारण आता o2 level वाढली होती त्यामुळे आशा थोडस बोलत होती,मेसेजेस पहात होती.

हाँस्पिटल मधे त्याने डबा दिला आणि घरी आला.

तर ऋतुज धावत आला.बाबा आई परत सिरियस झाली आहे.दम लागतो आहे परत तिला.

अरे डबा खाल्ला का तिने? अधिरतेने मोहन ने विचारले.

अहो बाबा खाण्याच काय घेऊन बसलात तुम्ही?मी जाऊन येतो.
कळवतो तुम्हाला.

आणि हे गाण लागल होत ‘नसतेस घरी तू जेव्हा’ त्याला ऐकवत नव्हत.

तेवढ्यात फोन आला . ऋतूज सांगत होता, “बाबा आई थोडस सूप प्यायली आणि तुम्हाला निरोप दिला आहे कि सूप चविष्ट झाल आहे म्हणून”.

मोहन ने हळूच देवाला नमस्कार केला आणि पालकाच्या सुपाची रेसिपी शोधायला गुगल ओपन केल.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »