गाढवाचा व्हँलेनटाईन

गाढवाचा व्हँलेनटाईन

गाढविण म्हणाली गाढवाला
करू या आपणही व्हँलेनटाईन डे साजरा।

नेशील का मला नाटकाला
एका लग्नाच्या दुसऱ्या
गोष्टीला।

आणशील का एक पांढरा झगा
मिरवून दाखवेन साऱ्या जगा।

गाढव पडला शेवटी नवरा
न ऐकून काय करतो बिचारा।

डोक खाजवून खाजवून थकला
फेफरे येऊन तिथेच पडला।

यम आला स्वप्नात
विना आमंत्रण का आला
स्वर्गात।

देवा मला दोन दिवसांसाठी
मनुष्य जन्म दे
माझ्या गाढविणीची हौस
पुरवू दे।

‘तथास्तु’ यम म्हणाला
गाढव गालातल्या गालात हसला।

गाढव झाला सुकुमार राजकुमार
गेला गाढविणीसमोर
घेऊन फुलांचा हार।

गाढविणीने मारली जोरात लाथ
एकाच फटक्यात गेला
परत स्वर्गात।

यम लागला हसायला
काय रे परत गाढवा गाढवासारखाच वागला।

मनुष्य जन्म देऊनही
गाढविणीलाच
I Love You म्हणायला
गेला।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »