दोन दुभंगलेली मने
अचानक समोर आली
माणसांच्या घोळक्यात
एकमेकांना अजमावयास लागली।
तळ मनाचा कोणाच्याच लागेना
ठेवलेला वेदनेचा दगड जागचा हलेना।
घाव दिलेले एकमेकांना
आठवून आता सोसवेना।
आयुष्याच्या रिकामपणात
आठवणीच फक्त जाईनात।
कस मन वेड असतं
प्रेमात गावलेल सुख सोयीस्कर विसरतं
दुःख मात्र मनात जपून ठेवतं।
कारण आरंभापेक्षा
अंतालाच तर महत्त्व असतं।
अचानक समोर आली
माणसांच्या घोळक्यात
एकमेकांना अजमावयास लागली।
तळ मनाचा कोणाच्याच लागेना
ठेवलेला वेदनेचा दगड जागचा हलेना।
घाव दिलेले एकमेकांना
आठवून आता सोसवेना।
आयुष्याच्या रिकामपणात
आठवणीच फक्त जाईनात।
कस मन वेड असतं
प्रेमात गावलेल सुख सोयीस्कर विसरतं
दुःख मात्र मनात जपून ठेवतं।
कारण आरंभापेक्षा
अंतालाच तर महत्त्व असतं।
- Varsha Hemant Phatak