आनंदी

आनंदी

कामवालीने ठेवता घरात पाय
माझी प्रतिभा उडू उडू जाय।
लावला तिने ज्या क्षणी
भांड्यांना हात
सुमधूर संगीत गुंजू लागले कानात।

फिरवायला झाडू जेव्हा तिने घेतला हातात
जणू काही नर्तकी च आली माझ्या दारात।

किती गोड वाटल्या म्हणून सांगू
तिच्या हालचाली
त्या पुढे सारी दुनिया फिकी वाटली।

घेतली जशी तिने निवडायला
कांदा पात
मला वाटे जणू आहोत
आपण स्वर्गात।

आनंद मनिचा गगनात मावेना
कोणाला सांगितल्या शिवाय
चैनही पडेना।
आली मग आपल्या ग्रुपची आठवण
Post करूनच टाकली मग पटकन।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »