मी एक समाजसुधारक होतो.गावोगावी जाऊन
कार्यशाळा घ्यायचो.तेव्हा
काही प्रश्न खेड्यातील बायकांना विचारायचो.
एकदा असच एका खेड्यात गेलो होतो.
10/12 बायका मोठ्या मुश्किलीने जमल्या होत्या.
मी विचारलं तुमचे हक्क, तुमच्या इच्छा तुम्ही कशा पुर्ण करता?मनात येईल ते करु शकता का?मनावर ओरखाडे पडले कि कशा वागता तुम्ही?
मन कशाशी खातात रे भाऊ?
ह्याला जपायच म्हणजे काय करायचं?
ह्यावर ओरखाडे पडतात म्हणजे काय होत हो भाऊ?
आमास्नी सांगाल का?
अहो ताई मन म्हणजे आपल मनं. मी म्हणालो.
आणि माझं मलाच हसायला आलं आणि नंतर त्या बायकांची दयापण आली.
द्रौपदी बाई तुम्ही सांगा बरं मला घरी तुम्हाला काही करावस वाटलं तर तुम्ही ते पूर्ण कस करता? त्यासाठी काय करता?
काईच्या काई बोलताबा तुम्ही दादा!!काई विच्छा -बिच्छा नसते.कारभारी ची इच्छा ती माझी इच्छा! मी हात जोडले
त्या माऊलीला!
तुमच लग्न तुमच्या इच्छेनुसार झाल नं कमळा ताई? मी दुसरीला विचारले.
तशा सगळ्या जणी हसायला लागल्या.
अवो दादा लगिन कवा लागलं ते च नाय आठवतं बघा मला.तर इच्चा होती कि नाय ठाऊकच नाय!
आता काय बोलणार!कप्पाळ!
बऱ्याच ठिकाणी असे अनुभव यायचे.मन नावाची जाणीवच नसायची कित्येक बायकांमधे.वैषम्य वाटायचं मला.मी अजून हिरिरीने काम करायचो.त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून द्यायचो.
तितक्याच एक बाई उभी राहिल,”जिचा नवरा महिन्यातले 25/26 दिवस घराबाहेर असतो त्या बाईने मनं कस सांभाळायचं?काही उपाय आहे का तुमच्या जवळ?
एवढी शुद्ध भाषा?कोण आहात तुम्ही?
मी उर्मिला, तुमची बायको!
तू इथे काय करते आहे?
तुम्ही साऱ्या दुनियेला सांगत फिरता कि बाई च मन जपा.पण मग घरच्या बाईच कायं?ती वाऱ्यावर?
हो ग,माझ चुकलं! मी तुला ग्रुहित धरत गेलो नेहमीच.मला तुझी केव्हाची माफी मागायची होती पण नाही जमलं.माफ कर मला.
नाही. माफी नको! एक वचनं हवं मला !
वचनं?कोणत?
घर सांभाळायला मी खमकी आहे. तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा. त्यात खंड नका पडू देऊ.मला महत्त्व कळलं आहे तुमच्या कार्याचं.