दोन्हीकडचा कपड्याचा खर्च तुम्हीच करायचा आणि येण्याजाण्याचा बसचा खर्च *पण* तुम्हीच करायचा. इति वर पक्ष!
मुलीकडचे माना डोलावतात. हो ला हो लावतात.
*पण* आम्हीच *का*?
हा प्रश्न कोणीच विचारत नाही. हिंमतच नसते लग्न मोडलं तर?
लहानपणापासून लग्न ठरेपर्यंत मुलाचा सगळा खर्च आईवडील अगदी शिस्तीत करतात. अगदी वेळ पडलीच तर डोनेशन वगैरे देऊन इंजिनिअर, डॉक्टर ही करतात *पण*..
लग्नाची वेळ आली की मात्र
मागण्या सुरु?जसंकाही मुलाला जन्म देऊन त्यांनी सुनेच्या घरच्यांवर उपकारच केले आहे.
*पण* तोंड वर करुन नाही जमणार असं मुलीकडचे कोणीच म्हणत नाही.
*का* ?
अरे, लग्न तुझंही आहेन, मग येण्याजाण्याचा प्रवास खर्च मुलीकडच्यांनी का करायचा?
तुझ्या कपड्यांचा खर्च मुलीचे आई वडील *का* करतील?
कार्यालयाचे भाडे *का* फक्त मुलीकडचेच देतील?
औकात नाही तर नको करुस लग्न!
*पण*...
हे असंच असतं!
*का*?
म्हणून विचारलं तर मुलगी उद्धट ठरते
*पण*..
चूप बसली तर विनयशील म्हणून ओळखली जाते.
*का*? पेक्षा *बरं* म्हणणारी मुलगी सासरी नावं कमवते.
हुंडा आणणाऱ्या मुलीचा भाव सासरी वाढतो.
*का*? ला उतर नाही.
*असो*!
*चला!* अतिशहाण्या बाईची बडबड बंद करा आणि तिच्या मुसक्या बांधा *बरं!*