या झोपडीत माझ्या

या झोपडीत माझ्या

गरीब आणि सुखी ?
मला नाही पटत हे!
आणि प्रत्येकाने गरीबीत सुख मानल तर देशाची प्रगती कशी होणार?

पण आजकाल एक फँड निघाले आहे.भौतिक सुख आणि मानसिक सुख यात तुलना करायची,गरीब - श्रीमंत यात श्रीमंत हा नेहमीच दुःखी दाखवायचा,कारण तो भौतिक सुखाच्या मागे धावतो,पैशाच्या मागे धावतो,त्याच्या कुटुंबाला वेळ नाही देत,त्याची बायको दुःखी, कुटुंबाकडे दुर्लक्ष वगैरे वगैरे। मला हे उगीचच वाटत,मेहनतीने पैसा कमावण्यात गैर काय आहे?? आणि गरीबांच्या झोपडीत जाऊन कोणी बघितले हो कि तो सुखी आहे, आनंदी आहे ते?आपल्या अकलेचे तारे तोडायचे!!अरे ज्याला उद्या रोजगारीवर काम मिळेल की नाही ही चिंता असते तो गरीब कसा सुखी असेल?आमच्या इथे सकाळी मजूरांची रांगलागली असते काम मिळवण्यासाठी. चिंतेचा राक्षस आवासून झोपडीत उभा असेल तो सूखी कसा?

जेव्हा माणसाजळ भरपूर पैसा येतो तेव्हा त्याला बहुतेक मानसिक सुख-दुःखाची स्वप्न पडायला लागतात कारण पोटाची आग शांत झालेली असते आणि ती आता डोक आणि मनाला उद्विग्न करत असते.
तरीपण तो माणूस देवाला मला परत गरीब कर अस नाही म्हणतं नं?
माणसाला सुख बोचत अस म्हणतात ते कदाचित हेच असाव.

मला वाटत मेहनतीने केलेल्या श्रमातून ज्याच्यावर लक्ष्मीची क्रुपा होते तो खरा श्रीमंत!!

कथा-कादंबऱ्यातून गरीबीच मानसीक,सांस्कृतिकद्रुष्टया आणि संस्कारिकद्रुष्ट्या उद्दातीकरण केले असेल पण त्याने भौतिक सुख नाही मिळत त्या गरीबाला आणि भौतिक सुखाच महत्त्व उगीचच दांभिकतेचा मुखवटा पांघरून नाकारू नये.

गाई पाण्यावर काय म्हणूनि आल्या,ही कविता वाचतांना सगळ डोळ्यासमोर उभ राहतं.

गरीबी हटाव हा आपल्या देशाचा ही नारा आहे कारण त्यामुळे सामाजिक असमानता निर्माण होते पण फक्त नारे देऊन काहीच होणार नाही.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »