चेहरा

चेहरा

दिल का आलम मै क्या
बताऊ तुझे
एक चेहेरेने बहोत प्यारसे
देखा मुझे।
आईशप्पथ!!कधी वाटलच नव्हत कि आपणही मजनू बनू म्हणून!

पण खरच, ती पहाताच बाला,कलेजा खलास झाला.

मी कोण या गोष्टीला काही महत्त्व नाही(16 ते 20 या वयातला कोणताही मुलगा) पण मला काय वाटत हे नक्कीच महत्त्वाचे आहे.

काळ्या रंगाचा ड्रेस तिच्या गोऱ्या अंगावर खुलत होता.मोगऱ्याचा गजरा अलगदपणे वेणीवर विसावला होता, बोलतांना गालावर पडणारी खळी काळजात घुसली होती आणि डोळे हे जुल्मी गडेच होते.आता तुम्ही म्हणाल एवढी रुपाची खाण कशाला तुझ्याकडे पाहील? बरोबर नं? मान्य एकदम।
पण मुलाच रुप नसत बघायच कर्तृत्व बघायच असत अस कोणीतरी म्हणून गेल आहे.
त्यामुळे मी आता कर्तबगार व्हायचं ठरवल होत.मन लावून अभ्यास करायला लागलो.नाटकात वगैरे भाग घ्यायला लागलो.येताजाता म्हातारी माणस दिसली कि मी त्यांना मदत करायला लागलो.न जाणो कोणीतरी तिचा नातेवाईक असायचा.बाबांना सांगितले कि मला क्लास लावायचा आहे. बाबांनी चष्म्यातून बघितल आणि मान डोलावली. मला खूप भारी वाटत होतं.कारण ती पण त्याच क्लासला येत होती.
पहेला प्यार ,लाए जीवन मे बहार अस झाल होत.

चेहरा है या चाँद खिला है ।हे गाण मी येता-जाता गुणगुणायला लागलो होतो म्हणजे ती दिसली कि आपसूकच निघायचं. मी आता शायर पण झालो होतो.
*उनके आनेसे जो आती है,मुँहपे रौनक ,तो वो समझते है कि बीमार का हाल अच्छा है*
मिल जाए तेरे दरकी दरवानगी मुझे,किसीको अंदर आने न दूँ,तुझको बाहर जाने न दूँ।

अस काहीबाही मी पाठ करायला लागलो.

मी चक्क पहिला आलो होतो काँलेजमधून!

पण अजून काही कोणी मला नाजूक आवाजात अभिनंदन अस म्हणालं नव्हतं.मी जरा नाराजच होतो.काय कराव सुचत नव्हते. मित्रांना सांगितले असते तर टर उडवली असती.

आज काँलेजचा शेवटचा दिवस होता. मला बाबांनी सांगितले होते कि घरची शेती बघायची आहे. खाऊन पिऊन आपण सुखी आहोत. नोकरी वगैरे काही नको. आमच्या कडे बाबांचा शब्द शेवटचा.

तितक्यात मक्या सांगत आला कि तिच लग्न ठरल आहे बहुतेक!!

मेरे दिलके टुकडे हज़ार हुए कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा।

कसाबसा घरी आलो तर
बाबा म्हणाले ही मुलगी बघ तुझ्याच काँलेजमधे आहे आणि तूझ हिच्याशी लग्न ठरवलं आहे. ही माझ्या मित्राची मुलगी!

ही तिच होती.
आनंदी आनंद गडे
पण...................

आता माझ मत बदलले आहे, मुलीच फक्त सौंदर्यच नाही तर गुणही पहावे.
आता मी म्हणतो,*मुझे मेरी बीवीसे बचाओ,बचाओ*।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »