वर्षाराणी

वर्षाराणी

वर्षाराणी का ग अशी रुसते
लहर येईल तेव्हाच
बरसते।

नाही पहात काळवेळ
अवचित येण्याचा
चालवला आहेस खेळ।

आधी होती तू किती शहाणी
वेळेवर तू बरसायची अवनी।

मळा,पिके आणि भाजी
वेळच्यावेळी फुलवायची
सुखाची सुगी मनात
भरुन उरायची।

आता मात्र का ग रडवतेस
उभी पिके नासवून,
डोळा आमच्या पाणी आणतेस।

अशी कशी ग तुझी भूक अघोरी
एकदा तरी वळून बघ
माघारी

दिसेल तुला त्याच्या
डोळ्यातले पाणी आणि
लटकलेले कलेवर
प्रत्येक अंगणी।

कधी तरी पाळ येण्याच्या वेळा
शेतकऱ्याच्या नशिबाचा
फुलू दे मळा।

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »