उगीचच


उगीचच
दोन्हीकडचा कपड्याचा खर्च तुम्हीच करायचा आणि येण्याजाण्याचा बसचा खर्च *पण* तुम्हीच करायचा. इति वर पक्ष! मुलीकडचे माना डोलावतात. हो ला हो लावतात. *पण* आम्हीच *का*? हा प्रश्न कोणीच विचारत नाही. हिंमतच नसते लग्न मोडलं तर? लहानपणापासून लग्न ठरेपर्यंत मुलाचा सगळा खर्च आईवडील अगदी शिस्तीत करतात. अगदी वेळ पडलीच तर डोनेशन वगैरे देऊन इंजिनिअर, डॉक्टर ही करतात *पण*.. लग्नाची वेळ आली की मात्र मागण्या सुरु?जसंकाही मुलाला जन्म देऊन त्यांनी सुनेच्या घरच्यांवर उपकारच केले आहे. *पण* तोंड वर करुन नाही जमणार असं मुलीकडचे कोणीच म्हणत नाही. *का* ? अरे, लग्न तुझंही आहेन, मग येण्याजाण्याचा प्रवास खर्च मुलीकडच्यांनी का करायचा? तुझ्या कपड्यांचा खर्च मुलीचे आई वडील *का* करतील? कार्यालयाचे भाडे *का* फक्त मुलीकडचेच देतील? औकात नाही तर नको करुस लग्न! *पण*... हे असंच असतं! *का*? म्हणून विचारलं तर मुलगी उद्धट ठरते *पण*.. चूप बसली तर विनयशील म्हणून ओळखली जाते. *का*? पेक्षा *बरं* म्हणणारी मुलगी सासरी नावं कमवते. हुंडा आणणाऱ्या मुलीचा भाव सासरी वाढतो. *का*? ला उतर नाही. *असो*! *चला!* अतिशहाण्या बाईची बडबड बंद करा आणि तिच्या मुसक्या बांधा *बरं!* *का बरं पण*??? वर्षा हेमंत फाटक, पुणे


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
0 214