देवा जरा बसू आणि बोलू रे
दुःख एकमेकांचे जरा शेअर करू रे।
तुला काय असणार म्हणा दुःख रे
आहे तू एकदम पाँवरफुल रे।
आले संकट की घेतो
तुझेच नाव रे
तेव्हा मात्र तू असतो
Out of reach रे।
शेवटी येतो आमचा
माणूसच कामाला रे
फायदा नाही होत काही
तुझ्या नामस्मरणाचा रे।
देव हसला आणि म्हणाला,
काहीही न करता
तू का माझ्या वर
विसंबतोस रे।
असेल माझा हरी तर
देईल खाटल्यावरी
हे तुझे आवडते
वचन ना रे।
तुझ्या सारखे शेकडो
हाक मारतात रे
म्हणूनच नाही जात मी
कोणाच्याही मदतीला रे।
कितीही मग तू म्हण
मला दगडाचा तू देव रे
तुझ्यासारख्या रिकामटेकड्यांचा
नव्हतोच मी कधी रे।