दोस्ती

दोस्ती

C1 : अरे बघ रे आली का ती? धपधप चालण्याचा आवाज येतो आहे.

C2: हो तिच आहे पळ पळ.काही खर नाही आपल.
दोघेही पळतात .
भांडी आपटण्याचा आवाज येतो. मग सगळं शांत होत.

C1 : चला झोपली वाटतं बया. नेम भारी आहे हं हिचा. काल C9 मेला बिचारा.नेम धरून पातेलं मारले तिने.

C2: मी काय म्हणतो उद्या आपण दोघेही एकत्रच हल्ला करु .मग बघ कशी पळता भुई होते तिची.
चल झोप आता.

C1 : अरे हिची सासू पण खतरनाक आहे .सांभाळून. तिच्या खोलीत नको जाऊस.Direct Yellow Heat मारते.आपले खूप जण मारले तिने.

C2 : अरे मग तू कसा काय निसटलास?

C1: अरे, विसरलास का ?मला उडता येत.मी चकमा दिला त्या म्हातारीला. पण नंतर झाडू घेऊन दोन तास शोधत होती मला. तिच्या चष्म्याच्या घरात लपून बसलो होतो मी.

अरे वास येतो आहे रे.तूला म्हणालो न किचन मधे नको जायला. मारल तिनी काळ हीट.आईग कसतरी होतं आहे.
C2 तू जा तिकडे. नको येऊस मला वाचवायला.

C2 : ये दोस्ती हम नही तोडेंगे! माणसात राहून नातं निभवायला नक्कीच शिकलो आहोत.मी या परिस्थितीत तुला नाही सोडू शकत.
दोघेही मरतात.

बाई: मेले एकदाचे !!काल पासून या झुरळांनी उच्छाद मांडला होता नुसता.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »