शेअर करावेसे असे काहीतरी


आज इंडियन आयडॉल बघत होती. उत्कर्ष वानखेडे आणि मेनुका पौंडेल(ती दृष्टिहीन आहे) माझे दोघेही आवडते.
आजच्या एपिसोडमध्ये मेनुका ने शिरडीवाले साईबाबा आया है तेरे दरपे सवाली हे गाणे ऐकवले. अप्रतिम गाते ती प्रश्नच नाही पण असं वाटलं की सिनेमात जशी ही कव्वाली संपता संपता निरुपारॉयची दृष्टी परत येते तसा काहीसा चमत्कार व्हावा आणि आत्ता या क्षणाला काहीतरी जादू व्हावी आणि मेनुकाला निरुपारॉयला मिळते तशी दृष्टी मिळावी पण चमत्कार फक्त सिनेमात आणि गोष्टीत घडतात, प्रत्यक्षात नाही याची जाणीव तीव्रतेने झाली.
भक्ति मे शक्ति असते का? हा प्रश्न परत एकदा सतवायला लागला.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »