संकट ज्याचे त्याचे

संकट ज्याचे त्याचे

आज सगळ्या देवांना मेसेज आला होता कि तातडीने इंद्राच्या प्रासादात हजर व्हा.
सगळे देव जरा विचारातच पडले होते.बर आता काही इंद्राचे आसन डळमळीत होईल असे पराक्रमी पुरुष धरेवर उरले नव्हते. मग झाले तरी काय?

सगळेजण निघाले.
ब्रम्हदेवांनी विचारले,"एवढ्या तातडीने सभा का बोलावलीस?मी दुसरी स्रुष्टी रचण्यात मग्न होतो,अर्धवट काम टाकून आलो आहे".

इंद्र म्हणाला," ब्रम्हदेवा तोच तर लोचा झाला आहे, तुम्हाला का आणि कशाला दुसरी स्रुष्टी बनवायची आहे?आहे तेवढी एक पुरेशी नाही का?"

ब्रम्हदेव म्हणाले कि अरे प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट कालांतराने नष्ट होते तशी ही पृथ्वी पण नष्ट होणार मग दुसऱ्या सृष्टीची
निर्मिती नको का करायला?

सगळे देव एकदम म्हणाले ,"नको दुसरी सृष्टी".

इंद्र म्हणाला," ब्रह्मदेवा एक करा या नवीन जगात मानवाची निर्मिती नका करु आणि केली तर त्याला मेंदू नका देऊ.या मेंदूच्या जोरावर हा मानव चंद्र आणि मंगळावर आला, काही काळाने तो इथपर्यंत येईल आणि ते संकट आम्हाला नको आहे. आवरा तुमच्या मानवाला.तो स्वतः प्रतिसृष्टी निर्माण करायचा विचार करतो आहे."

ब्रम्हदेव म्हणाले," ठीक आहे, मी बघतो,हे काही एवढे मोठे संकट नाही आहे,मानव स्वतः ला कितीही हूशार समजू दे शेवटी त्याच्या ज्ञानाला मर्यादा आहेत.मी त्याची बुद्धी आणि स्मृती 100 वर्षे मागे नेऊन ठेवतो".

इंद्र म्हणाला,"देवा असे झाले तर फार बरे होईल, विज्ञानाच्या जोरवर हा मानव आपल्याशी बरोबरी करतो आहे आणि आपल्या अस्तित्वालाच चँलेंज देतो आहे".

ब्रम्हदेव म्हणाले कि ते सगळ्या जगाला 100 वर्ष मागे नेणार आहेत. जेणेकरून ही झालेली प्रगती मानव विसरेल आणि परत नवीन नवीन शोध लावेल आणि जग सुरु राहील".

सगळे देव खुश झालेत.एक मोठ संकट टळले होते.

ब्रम्हदेवांनी कोणतातरी मंत्र म्हणून सगळ्या जगाला 100 वर्ष मागे नेल.एक दिवसभर सगळं जग झोपले होतं.कोणाला काहीच कळले नाही. पण.........

झोपतांना प्रत्येक मानवाजवळ एक गोष्ट होती.*मोबाईल* जो फुल चार्ज होता आणि डेटा सेव्हड होता.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »