पर्याय

पर्याय

परवा पुस्तकांच्या दुकानात गेले तर बऱ्याच पुस्तकांवर 80% डिस्काउंट होते.सहज बघायला गेले तर सगळ्या डिक्शनरी होत्या. वाईट वाटलं पाहून. ज्या डिक्शनरीसाठी आपली पिढी जीव टाकायची ती अशी धुळ खात पडली होती. मला वाटतं काही दिवसांनी ती नक्कीच रद्दीत जाणार होती.
अचानक मनात विचार चमकुन गेला कदाचित आपल्या शिक्षकांची पण तिच गतं तर होणार नाही नं? परवा क्लासला सुट्टी दिली होती.अर्थात होमवर्क दिलेले होते.एक गणित मला माहीत होत कोणालाच येणार नाही. मी समजावून सांगणार होते.पण सगळी मुलं म्हणाली,”काकू आम्ही व्हिडीओ पाहिला त्या गणिताचा, समजलं आता”. म्हणजे शिक्षकांना पर्याय तयार होतो आहे तर !! धस्स झालं.

पण मग विचार आला ठिक आहेनं, Online समजावून सांगणारा पण कोणीतरी शिक्षकच आहेनं!मग कशाला वाईट वाटुन घ्यायचं?
माध्यम बदलले आहे,शिक्षकांचे महत्त्व तर तेवढेच आहे.
Happy Teachers Day!!

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »