पुस्तक परिचय : खरं सांगायचं तर.......


काल *खरं सांगायचं तर...* हे नीता कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले पुस्तक वाचून झाले. करण जोहर एक प्रथितयश दिग्दर्शक, लेखक, मुलाखतकार, आत्मविश्वास कुटकुट भरलेला माणूस!! An Unsuitable Boy अनसुटेबल बाॉय हे पुस्तक मी वर्षभरापूर्वी विकत घेता घेता थांबली होती आणि परवा लाईब्रेरीत मिळाले तर लगेच घेतलं. थोडक्यात काय तर विकत घेऊन वाचण्यासारखे इंटरेस्टिंग नाही वाटलं मला पण
खरंच सांगते एका बैठकीत वाचण्यासारखे पुस्तक आहे हे! अनपेक्षितपणे चांगले निघाले. जसे महेश कोठारे यांचे पुस्तक मला अशोक सराफ यांच्यापेक्षा जास्त आवडले, तसेच काहीसे झाले. करण जोहर चं खरं सांगायचं तर... मनाला भिडलं हे नक्की!

करण जोहर वाचतांना आपलासा वाटला. अवार्ड सेरिमनीच्या वेळेस शाहरुख खान आणि करण जोहर चे फाल्तु जोक्स ऐकून माझ्या तो डोक्यात जायचा पण पुस्तक खरंच छान झाले आहे. कधीतरी वाटतं एखाद्या फिलॉसाॉफरच पुस्तक तर नाही आहे हे! सिनेजगताबद्दलचे आकर्षण तर पुस्तक वाचतांना होतेच. लिखाणाची शैली मस्त आहे. एखादी गोष्ट रंगवून सांगायची लकब लागते ती नक्कीच आहे मला वाटतं हे लिखाण अपयशाची चव चाखलेल्या यशस्वी माणसाचे आत्मकथन जास्त आहे. माणसाच्या बालपणातल्या बऱ्याच गोष्टी पुढील आयुष्यात डोकावतात करण जौहरच्या बालपणीच्या काही गोष्टी त्याच्या सिनेमात डोकावल्या आहेत. (शुजच्या लेस बांधता न येणारा कभी खुशी कभी गम मधला मुलगा)
वरुन दिसणारे सिनेमाचे आभासी जग आणि त्यातील सच्चाई बऱ्याच सच्चेपणाने मांडल्याचं जाणवतं राहात हे पुस्तक वाचतांना.
शाहरुख आणि काजोलबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. त्या नक्कीच आवडतील आणि मैत्री ही प्रत्येकासाठी महत्त्वाची असतेच परंतु गैरसमजाची कीड लागली की काय होतं हे समजून येतं. अर्थात अपूर्व या त्याच्या मित्राचे कौतुक आणि उल्लेख पुस्तकात सतत येत राहतो.

आदित्य चोपडा आणि करण जोहर ची मैत्री नक्कीच दोघांबद्दल आदर निर्माण करते. दोघेही गाजलेले दिग्दर्शक पण एकमेकांच्याबद्दल आदर बाळगून असलेले, आदित्य चोपडाने केलेली मदत करण जौहरने निःसंकोचपणे कबूल केली आहे.
तसेच आई वडिलांशी असलेले घट्ट नाते, आईची कडक शिस्त, हॉस्टेलमधील आयुष्य, प्रेम या सगळ्या गोष्टी पुस्तकात मांडल्या आहेत.

कभी अलविदा ना कहना,त्यावर अनेक मतमतांतरे, आकर्षण आणि व्यभिचार याबाबत त्याची मत कधीतरी संकुचित वाटतात पण ज्या जगापासून आपण सामान्य लोक दूर आहोत तिथे कदाचित असे घडत असेलही!!
कुठेतरी ते अपिल होतं.
काॅफी विथ करण चे अनुभव वाचण्यासारखे !

शबाना आझमी ने कुछ कुछ होता है बघितल्यावर पास केलेले कमेंट आणि करण जौहर चे त्यावर मांडलेले विचार पटतात!

स्वतःकडे तटस्थपणे आणि पारदर्शकतेने बघणारा हा माणूस मला पुस्तकरुपात तरी नक्कीच आवडला. लहानपणी लठ्ठ, थोडासा एकांतप्रिय आणि बऱ्याचशा गोष्टी अर्धवट सोडून देणारा मुलगा कुठच्या कुठे जाऊ शकतो हे पाहून आपण अचंबित होतो आणि नकळतपणे नापास मुलांची गोष्ट या पुस्तकाची आठवण होते.

पुस्तकातील त्याचे शेवटचे वाक्य
'मृत्युला मी घाबरत नाही.. पण कधी कधी आयुष्य मला मात्र घाबरवून टाकतं....'
हे वाक्य अंतर्मुख करतं.

एकदा तरी हे पुस्तक वाचायला हरकत नाही.

वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »