नितीन डोक्याला हात लावून बसला होता.
तितक्यात नर्सने त्याला मेडिसिन चा कागद आणून दिला.
नितीनच वय आता 40 वर्षे होत आणि अनघा त्याची बायको लिव्हर च्या आजाराने अँडमिट होती. आता जवळजवळ15 दिवस होत आले होते. 2/3 लाख खर्च झाले होते आतापर्यंत. नितीन सहकारी बँकेत होता. आर्थिक स्थिती खूप चांगली नव्हती आणि त्यात हे संकट. पार कोलमडून गेला होता तो.अनघाच्या तब्येतीची त्याला काळची वाटतं होती. मूलबाळ नसल्याने तर जास्तच.अनघाशिवाय आपल कस होईल?या विचारानेच तो खचला होता.
तितक्यात नर्स आली आणि तिने सांगितले कि मुंबईहून दुसऱ्या डॉक्टर आल्या आहेत. त्यांनी आत बोलावल आहे.
आत जाताक्षणी डॉक्टरीण बाई म्हणाल्या
काय ओळखलत का?
तोच गोड आवाज ,तेच पाणीदार डोळे.
तू ,तूम्ही?
हो मी च लतिका!
अग पण तू तर लंडनला गेली होती नं? परत कधी आलीस?
अरे परवा आले.इथे एक महिना राहाणार आहे. ह्या हाँस्पिटल चे साने डॉक्टर माझे मित्र आहे म्हणून केस स्टडी साठी आले इथे. तर तूझ्या बायकोच नाव वाचलं.
नितिन एकेक शब्द कानात साठवत होता. तेव्हा ही लतिका त्याच्यासाठी अप्राप्य गोष्ट होती. पहिले प्रेम होत त्याचे ते.शेजारी राहायचे दोघेही. पण त्याने ते कधीच व्यक्त केल नव्हत. कारण तिची हूषारी ,सौंदर्य हे आपल्यासाठी नाही हे त्याला माहीत होत.पण त्याच जीवापाड प्रेम होत लतिकावर.
उद्या एक आँपरेशन करु परत.मी नर्सला सांगते सगळं.
ठीक आहे. अस म्हणून तो उठला.
पाच मिनिटांत नर्सने कागद हातात ठेवला आणि उद्या पऱ्यंत साठहजार जमा करायला सांगितले.
कुठन आणू एवढे पैसे आणि आता तो डॉक्टर सान्यांशी पण बोलू शकत नव्हता. लतिका समोर कमीपणा वाटला असता.
तो अनघाच्या रुममध्ये गेला तर ती झोपली होती.
परत बाहेर आला तर पाठीवर थाप पडली जोरात. सुलभा होती.
हे घे ऐंशी हजार आहेत.ती म्हणाली.
सुलभा काँलेजमधली मैत्रीण.त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी.सगळ्यांना मदत करणारी. तिने त्याला एकदोनदा लग्नाबद्दल विचारलं होत पण तो सुलभाला नाही म्हणाला होता. नितीनच लतिकावरच प्रेम तिला माहित होत तरीही ती नितिनवर मनापासून प्रेम करत होती. अनघा शी लग्न झाल्यावर मात्र तिच येण बंद झाल होत आणि आज अचानक समोर! ते ही पैसे घेऊन.
चल चहा घेता घेता बोलू.
सुलभा म्हणाली.
मला आईने काल सगळं सांगितले. म्हणून हे पैसे काढून आणले.एका शब्दानी ही बोलला नाहीस कि अनघा एवढी आजारी आहे ते.
सुलभा पैसे नको!
का?
लतिका फुकटात उपचार करणार आहे वाटतं?
तुला कस कळलं?
ती माझीही मैत्रिण आहे.
ठेव ते पैसे.
सुलभाने नितिनच्या हातात पैसे ठेवले आणि निघाली.
नितिन तिच्या पाठमोऱ्या आक्रुतिकडे पहात होता.
कोणाच प्रेम खर?
मी लतिकावर करतो ते?कि अनघावर बायको आहे म्हणून करतो ते प्रेम कि सुलभाच निस्वार्थ प्रेम?