पाहुणे
आनंद आला, घरभर फिरला,
इकडे तिकडे उंडारला,
सगळीकडे भरून पावला.
चैतन्य आलं, नाचायला लागलं,
अणुरेणुत भरून उरलं.
माझ्याकडे पाहून खुदकन हसलं.
सम्रृद्धी आली ती
प्रगती आणि उन्नतीला घेऊनच.
खुप बागडल्या, चिवचिवल्या.
घरात माझ्या ठाण मांडून बसल्या.
अहंकार आला मिरवित स्वतःचाच तोरा,
पण “विनया”ने कटाक्ष टाकताच
केला त्याने पोबारा.
वाजत गाजत मग दुःख आले.
सर्वांनी मिळून त्याचे तीन तेरा वाजवले.
तेव्हढ्यात घुमला बेलचा आवाज कानात,
दार उघडले तर उभे होते माझे आनंद, चैतन्य आणि सम्रृद्धी दारात!!
सांगा बर का धरावी मी मग खंत मनात?
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»