पिढीः आजची

पिढीः आजची

कमवा आणि उडवा खरं आहे.आजच्या पिढीचं वागण काहिसं असच आहे. पण मला वाटतं एक पिढी काटकसर करते.जी 70/80 च्या दशकातली आपल्या आईवडिलांची होती. मध्यमवर्गीय पिढी.कर्ज काढून घर बांधलेली. शुन्यातून विश्व निर्माण केलेली.

मग आपली पिढी जी आता पन्नाशी च्या जवळपास आलेली आहे. ती थोडी स्थिरावलेली. उच्च मध्यमवर्गीय.घर ,पैसा राखलेली. मुलांची सगळी सोय करुन ठेवलेली पिढी.
पण…….
विचार जुनेच असलेली.आपल्या प्रमाणेच आपल्या मुलांनीही काटकसरीने वागावे ही अपेक्षा करणारी.

का वागतील ते असे?
सगळी हिरवळ दिसते आहे कि.
बहिणीच लग्न करायच नाही कि लहान भावाच्या शिक्षणासाठी पैसे द्यायचे नाही. आईवडिलांना ही महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवायचे नाही. मग उडवणार नाही तर काय करणार? घर असतच !घेणार असेल तर पहिला हफ्ता आपण देतोच. तोशीस लागतचं नाही कुठे! मग फक्त वैचारिक वादावादी!!
कशाला सोडून द्या.

हाँटेल मधे चल म्हटल कि जायचं.1100 चा आहे कि 1200 चा बुफे आहे?पाह्यच नाही. ताव मारायचा आणि निघतांना बिल भरायच्या भानगडीत ही पडायचं नाही.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »