हालचाली सुरू झाल्या.
तरुणाई नाही तर म्हातारे कोतारे देखील रात्रीपासूनच रांगेत उभे राहिले. एवढी गर्दी तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पण नव्हती.
पण गंमत अशी की तिथेही मारामारी, धक्काबुक्की झालीच की राव!
म्हणजे देवा एवढे त्या मायफोनचे महत्त्व आहे की काय हा प्रश्न मनात आलाच?
मग देवाच्या दर्शनासाठी उभ्या असलेल्या लोकांचे जसे बाईट्स घेतले जातात तसे इथे रांगेत उभ्या असलेल्या लोकांचे पण एक जण बाईट्स घेत होती.
तुम्ही कधीपासून दुकानासमोर उभे आहात?
रात्रीपासून!
वाव चक्क बारा तास झाले तुम्ही उभे आहात! ग्रेट ग्रेट!
हे खरं प्रेम!
ती दुसर्याकडे वळली.
मी तर लोन काढले आहे मायफोन घेण्यासाठी! I just love it! एक सुंदर ललना!
आणि तिथे फोनवरचे तिचे प्रेम 'सेन्सॉर कट" झाले. तरी माझा शोन्या, मोन्या म्हणत केलेले लाड दिसलेच!
असो बापडे! शेवटी प्रेम कोणावरही करावे!
ह्याच्यावर, त्याच्यावर मायफोनवरही!
क्रेझी किया रे!
टीव्हीवर सगळीकडे तेच तेच!
मला हे सर्व पाहून एक प्रसंग आठवला.
मागच्या वर्षी आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मुलगा म्हणाला की मायफोनची पेअर तुम्हाला दोघांना गिफ्ट देतो. आम्ही तात्काळ एकसुरात नको म्हणालो. दोघांचेही फोन नीट चालत होते. उगीचच काय!!
हे ऐकून माझ्या मैत्रिणीने मात्र मला फैलावर घेतले. उगीचच!!!
मी किती आऊटडेटेड आहे हे मला पद्धतशीरपणे समजावले. चालायचंच!
ज्या फोनवर मला लिहीता येतं, बोलता येत, बऱ्यापैकी फोटो काढता येतात तो फोन माझ्यासाठी बेस्ट आहे. मायफोन का?
गागुचका आहेस तू! ती चिडून म्हणाली. तिची हळहळ काही केल्या माझ्यापर्यंत पोहचत नव्हती.
How can you do that! कदाचित तिला वाटल असावं की अमेरिकेत दोन महिने राहिले तर माझं इंग्रजी जास्त चांगले झालं असावं.
मी गाढवासमोर वाचली गीता या उक्तीतील गाढव झाले होते.
अजूनही विचार कर!
शेवटी तिथे मायफोन 15/16हजाराने स्वस्त मिळतो हे सांगून झाले. शेवटी तिच्यासाठी मात्र मी मायफोन घेऊन गेली. ती चक्क मला एअरपोर्टलाच भेटायला आली. किती ते माझ्यावरचे प्रेम???
मी निमूटपणे तिला मायफोन काढून दिला.
ईईईई! ओओओओ! माय माय! असं काहीस चित्रविचित्र आवाज काढतं तिने त्याला जवळ घेतले. मला thanks म्हणत दहावेळा गदागदा हलवून चालली गेलीस मी अवाक् होऊन पहात बसले ती गेली त्या दिशेने!
समाजमानसात क्रिकेटर, कलाकार यांच्याबद्दल असलेले वेड्यासारखे प्रेम पाहिले आहे पण एका यंत्रावरचे एवढे प्रेम पाहून मी थक्क झाले.
एखाद्या दिवशी साऊथमधून बातमी येईल की 'मायफोनचे' मंदिर बांधले गेले आहे आणि सोन्याच्या मायफोनची तिथे स्थापना केली आहे.
(गागुचका - गाढवाला गुळाची चव काय?)