मैत्रिणी
होळी आणि दिवाळी
दोघी होत्या मैत्रिणी
एक दिवस झाले भांडण
तू श्रेष्ठ कि मी श्रेष्ठ
दिवाळी म्हणाली
मी असते ग पाच दिवसांची
तू तर फक्त एकाच दिवसाची।
होळी म्हणाली,
असेन मी एकाच दिवसाची
पण मी आहे बिन खर्चाची।
तू येणार म्हटल
कि गरीबाला येत टेन्शन
कशी पुरी पडणार एवढीशी पेन्शन।
नविन कपडे ,फटाके
फराळाच सामान,
एवढ्या मोठ्या खर्चाने
मोडणार त्याची मान।
मी होते साधेपणाने साजरी,
तुझ्यासाठी मात्र करावी
लागते उधार-उसनवारी।
मला मनवायला पुरत
प्रेमाने भरलेल मन आणि
रंगाने भरलेले हात,
नको महागडे तेल आणि आतिषबाजी ची साथ।
हे सगळं ऐकून दिवाळी हिरमुसली,
बुरा न मानो होली है
म्हणत होळीने दिवाळीलाच रंगवून
टाकली.
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»