माझी अँसिडीटी

माझी अँसिडीटी
फिरून फिरून
येसी मज भेटाया
का ग तू अशी
त्रास देई जीवा या।

नकोच वाटे तुझी
आठवण ही मला
त्या जिवघेण्या वेदना
ना सोसवी जिवाला।

ह्दयातली ती बेचैनी
नि मस्तकातला शूळ
लागे जिव्हारी माझ्या
तुझ्या येण्याने खुळ।

जा सखे तू नको
येऊस परतुनि
तुझी याद जिवाला
जाई दुखवुनि।

सोड मला एकटेच
राहीन मी निवांत
अँसिलाँक नि ओमेझ
ठेवतिल मला सुखात।


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
Likes: 0 Views: 9