हे म्हणजे घरोघरी मातिच्या चुली तस हर टी.व्ही. सिरीयल मे मुँह मे राम बगल मे छुरी वाल एक तरी Character असतच असत.
मला तर वाटत कथा लिहीतांना प्रत्येक लेखक ही एकच म्हण डोळ्यासमोर ठेवून कथा लिहीत असेल. नाहीतर कथा समोर सरकणार कशी?
आनंदीबाई स्वामिनी मधे काय करतात? तेच समोरून गोड बोलायच आणि मागून पाठीत खंजीर खुपसायचा. त्यापेक्षा गोपिकाबाई परवडल्या at least जे बोलतात तेच त्या करतांना दिसतात आहे. पण आनंदीबाईंच character खतरनाकच कारण मुँह मे राम..। हे ब्रीद वाक्य।
मला वाटत हे या लोकांमधे उपजतच असाव. शाळेत असतांना पण काही मैत्रिणी अशा होत्याच न. भाषण देते तर स्वतःला जास्तच शहाणी समजते. अस मागून म्हणायच. पण पहिला नंबर आला कि हिच मैत्रिण अभिनंदन करायला पुढे. पाठ फिरली कि परत म्हणणार एवढ काय त्यात? भाषण तर कोणीही देऊ शकत. दिल असत तर आमचा ही नंबर आला असता.
कित्येक शिक्षकांना आपण मागून नाव ठेवतो पण practical’s चे marks त्यांच्या हातात आहे अस कळल रे कळल कि लगेच त्यांची खुशामत करायला तयार. आमचे एक सर होते खूप लठ्ठ होते आणि लूनावर यायचे. बरीच मुल त्यांना पाठीमागून उंदरावरचा गणपती अस म्हणायचे. पण internal marks त्या मुलांना पैकीच्या पैकी मिळायचे. कारण तेच ओठात एक….. ही ६५ वी कला त्यांना छान जमली होती.
संसारात पडल कि या म्हणीचा प्रत्यय पदोपदी येतो. सासूच्या हातात किल्या असल्या कि आई तुम्ही कित्ती हो धोरणी आहात!! किल्ल्यां ची अदलाबदल झाली रे झाली कि मात्र धोरणही पटापट बदलत. या बाबतीत मात्र सगळ्या राजकारण्यांनी PHD केली आहे. इथे हे राजकारणी एखाद्या बिलंदर सूनेलाही मागे टाकतील.
सिरियलच काय घेऊन बसलात! WA आणि fb वर पण एखाद्याच्या post ला अस 👌 करायच अस 👍 करायच आणि मागून म्हणायच कि copy paste तर करत असतो. इकडच उचल टाक तिकडे!! त्याला कसच काय येतय. आश्चर्यच वाटत या लोकांच! नका करू मग खोट खोट कौतुक. कोणी जबरदस्ती तर नाही करत आहे न? नाही आवडल. it’s fine! आपण neutral असू शकतो न एखाद्या गोष्टीबाबत. पण नाही मुँह मे राम……..
आजकालची मुल याला networking अस म्हणतात. बाँससमोर गोड बोलणारे promotion घेतातच. नाही जमत ते मागेच राहातात. अर्थात एखादा बाँस खमका असतो तो बरोबर दूध का दूध पानी का पानी करतो आणि तोंडाला पान पुसतो.
अर्थात गोड बोलण कधीही चांगलच पण त्यात नाटकीपणा नको. मग सगळच बिनसत. अर्थात खर बोललेल पण बऱ्याच जणांना आवडत नाही. ती माणस दुखावली जातात. पण निंदकाचे घर असावे शेजारी. अशी एक/दोन माणसे आपल्या आयुष्यात असली न कि आपण बरोबर जमिनीवर राहतो. हवेत उडत नाही.