मी आणि माझं पुणे


माझ्या पुण्याची महती
वर्णावी ग मी किती
वैशाली-रुपालीच्या संगे
लोकां ऐकवावी ती।

खावे-प्यावे मजेत जगावे
फोन बंद करुन ताणून द्यावे
उठूनि मग पर्वति चढावे
व्यायामाचे गोडवे गावे।

अधूनमधून दाखवून द्यावा
समोरच्याला हिसका
उपदेशाचे डोस पाजूनि
दाखवावा पुणेरी झटका।

भांडण आमचा प्रांत नव्हे
दुनिया ना ते माने
वादविवादच आम्हा भावे
खरा पुणेकरच ते जाणे

शस्त्रावीण लढला
तो एक चक्रधारी
शब्दांनी जो घायाळ करी
तो खरा पुणेकरी

वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »