कथा : तू चीज बड़ी है मस्त!
तू चीज बडी हैं मस्त मस्त
दोन तीन टगे हे गाणे म्हणत म्हणत चालले होते!
खाली मान घालून ती खुश होतं होतं, तिरपे कटाक्ष टाकत ती पण रस्त्यावर रेंगाळत होती!
हळूच एक बांगडी घरंगळत समोर आली, मग दुसरी, तिसरी
तिने मान वेळावत वेळावत एकेक उचलली आणि लपवली!
तू चीज बडी है मस्त मस्त! ती पण आता गुणगुणायला लागली आणि नाचायला पण!
लाल टी शर्ट जवळून एक चक्कर मारुन गेला
आती क्या खंडाला?
दस हजार रुपए है क्या फटी जेबमें?
तिने पार इभ्रतीचा चेंदामेंदा केला होता.
मित्र फिदीफिदी हसायला लागले तशी ती पण फिसकटली!
चौघांकडे चार बाटल्या फेकल्या तिने!!
गटागट पोटात रिचवल्या गेल्या.
बेधुंद, मदहोश!
नुकताच मुसळधार पाऊस पडुन गेला होता.
रस्ता मस्तपैकी ऐसपैस इकडे तिकडे पसरला होता.
तू चीज बडी है मस्त मस्त! मित्रांचा आवाज हळूहळू दूरुन ऐकायला यायला लागला.
साली, हसती है!
थांब दाखवतो मी काय हरामी आहे ते! त्याने दातओठ खात एक सणसणीत शिवी हासडली.
ए शिव्या नाही हां! आत्ताच बोलते हां!
तो सटपटला. हा आवाज कुठेतरी ऐकला आहे. कधी?
पण मित्रांना सांगायला तोंडातून आवाज नव्हता निघतं!
कानात फक्त आणि फक्त
तू चीज बडी है मस्त मस्त हे ऐकू येत होते
क्लबमधील सुनीता? पण तिचा तर आपण पार चेंदामेंदा केला होता.
ही कोण तिच भूत?
ह्या अस काही नसतं!
सालं डोकं गरगरतय!
हा एकेक जण असा खाली का पडतोय??
अरे ही आली की जवळ!
तो खुश! चीज बडी है मस्त मस्त
हातात काय आहे हिच्या?
फुटलेली बाटली?
सेम टु सेम!
तशीच! तीच! तीच आली परत?
पण कशी? साली गेम करते आहे
डोक्याला झिणझिण्या!
बाटली हळूहळू जवळ जवळ येते आहे, फुटकं टोक डोळ्याच्या दिशेने
अरे आपला हात का जड होतोय!
तिला मारायला हवं पण नाही जमत आहे!
तो मागे मागे सरकतो आहे
रखडत रखडत! कसाबसा!
ती मात्र हसत हसत मजा घेत घेत त्याच्याकडे सरकते आहे
आणि स्पष्टपणे तिचा चेहरा दिसला केसांच्या मधोमध!
तशीच कपाळावर असलेली खूण!
माफ कर यार सुनिता! आमचं चुकल. गलती हो गई! छोड दे!
आपण हिला भीख मागतो आहे! का?
परवा पार चोथा केला होता हिचा! इथे कशी?
तू कौन है। बोल ना!
चेहरा आता विदीर्ण व्हायला लागला होता त्याचा!
तुटक्या बाटलीचा एक वार चेहऱ्याने झेलला होता!
मी, आम्ही तर तू... ला क्लब हाऊसच्या मागच्या विहीरीत फेकले होते
तू... तू... कशी आली..
बाहेर... सांग न?
बाटली कचकन त्याच्या डोळ्यात शिरली
रक्ताची एक चिळकांडी उलाडली
नजरेतील आश्चर्य अजुनही तसंच होतं
तू चीज बडी है मस्त मस्त म्हणत ती डोळे पुसत पुसत क्लब हाउसच्या विहीरीकडे जात होती.
वर्षा हेमंत फाटक, पुणे
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»