कविता : कागदाचा मृत्यू
कागद आणि पेन
आज फारच उदास होते
साऱ्या जगाने त्यांना
दुर्लक्षित केले होते
शब्द आणि भावनांची
साथच सुटली होती
वाकड्या तिकड्या,
रेषांची मज्जा संपली होती
मौल्यवान अश्रुंच्या साथीने
पेन आणि कागद ही
एकजीव व्हायचे, तिथे
त्यांचेही प्रेम फुलायचे
कागद आठवत होता
त्या प्रेममय भावना निःशब्द
प्रेमप्रत्रावर उमटलेल्या
रक्ताच्या शाईचे शब्द
आसुसलेले पानही, शाई
टिपण्यास उतावीळ होते
रिकाम्या पेनाचे दुःख
त्याला घायाळ करत होते
एकटक त्या यंत्राकडे
हताशपणे दोघे बघत होते
शब्दांची घालमेल
शांतपणे अनुभवत होते
कोरड्या मनाने ती ही
स्क्रीनवर उमटत होती
पेन नि कागदाकडे
केविलवाणी बघत होती
कागदाचा मृत्यू झाला
जातांना तो दुःखी होता
एकच शल्य मनात होते
तो कोरा करकरीत होता
वर्षा हेमंत फाटक, पुणे
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»